शनिवार, २ मार्च, २०१९

जिल्हा रुग्णालयात 2 मार्च रोजी रोग निदान शिबीराचे आयोजन

जिल्हा रुग्णालयात 2 मार्च रोजी

रोग निदान शिबीराचे आयोजन  


रोग निदान शिबीरामध्ये प्रामुख्याने स्त्रीयांचे आजार विशेषत: गर्भ पिशवीच्या आजाराचे निदान व उपचार, रक्तदाब व मधुमेह तपासणी, मौखीक आरोग्य व मुख कर्करोग तपासणी, मुत्रपिंडाचे आजार, सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान व उपचार, मानसिक रुग्णांची तपासणी, लहान मुलांचे आजार, क्लब फुट, पोटाचे विकार व उपचार, आयुर्वेदिक व होमीओपॅथी तसेच युनानी उपचार पध्दती, आरोग्य प्रदर्शन व आरोग्य विषयक सल्ला, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विविध आजारांचे निदान व शस्त्रक्रिया, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत विविध आजारांचे निदान व उपचार आदिची सोय करण्यात आली आहे.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आजारांवर उपचार करण्याकरीता रुग्णांनी शिबीरास येतेवेळी मुळ आधार कार्ड व राशनकार्ड सोबत घेवून यावेत. असे जिल्हा शल्य चिकित्सक, परभणी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...