रविवार, ३० जून, २०१९

तरुणांकडून हरणाच्या पाडसाला जीवदान; वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे उपचारासाठी उशीर

तरुणांकडून हरणाच्या पाडसाला जीवदान; वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे उपचारासाठी उशीर


परभणी - जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील देवेगाव फाट्याजवळ तरुण शेतकऱ्यांनी हरणाच्या जखमी पाडसाची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर वनविभागाला फोन केला. मात्र, तब्बल ४ तासानंतर वनविभागाला घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांबाबत दाखवलेल्या निष्काळजीपणाबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.


सतीश गलबे आणि गजानन गलबे हे दोन शेतकरी शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतात जात होते. त्यावेळी देवेगाव फाट्याजवळ काही कुत्रे एका हरणाच्या जखमी पाडसाचे लचके तोडत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून त्या तडफडणाऱ्या पाडसाची सुटका केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र, तुम्हीच घेऊन या असे सांगण्यात आले. शेतीची कामे असल्याने आम्ही येऊ शकत नाही, असे त्या शेतकऱ्यांनी सांगितले. ते दोन्ही शेतकरी त्या जखमी पाडसाला घेऊन तब्बल ४ तास अधिकाऱ्यांची वाट बघत बसले. त्यानंतर दुपारी पाऊणेतीन वाजण्याच्या सुमारास वनविभागाचे रामराव राठोड, संदीप ठाणके घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्या जखमी पाडसाला उपचारासाठी परभणीकडे घेऊन गेले.

परभणी जिल्ह्यात केवळ १.६० टक्के वनक्षेत्र; प्रशासनापुढे १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे आव्हान

परभणी जिल्ह्यात केवळ १.६० टक्के वनक्षेत्र; प्रशासनापुढे १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे आव्हान


परभणी - यंदाच्या पावसाळ्यात परभणी जिल्ह्यात वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यात केवळ १.६० टक्के एवढेच वनक्षेत्र आहे. जिल्हा प्रशासनापुढे आता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून हा बॅकलॉक भरून काढण्याचे आव्हान आहे. 


परंतू 'नेहमीच येतो पावसाला' या उक्तीप्रमाणे ही मोहीम राबविल्यास पुन्हा परभणीकराना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे, हे निश्चित. दरम्यान, परभणी जिल्ह्यात यंदा १ कोटी २० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून ते विविध विभागांना विभागून दिल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिली.महाराष्ट्र शासनाने यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून कार्यक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत परभणी जिल्ह्यात १ कोटी १९ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात गुरुवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा वन अधिकारी विजय सातपुते उपस्थित होते.जिल्हाधिकारी शिवाशंकर म्हणाले, 'परभणी जिल्ह्याला देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर विभागांना हे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे. या वृक्ष निर्मितीची जबाबदारी वन आणि सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषी तसेच रेशीम विभागाला देण्यात आले होते. वन विभागाच्या एकूण ५९ रोपवाटिका जिल्ह्यात कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक रोपांना महत्त्व देऊन वड, उंबर, पिंपळ, बोर, करंज, सीताफळ, शिशु, सिरस, कडुलिंब या प्रजातींच्या वृक्षांची निर्मिती करण्यात आली आहे. शासकीय यंत्रणे सोबतच सामान्य नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन दुष्काळ आणि पाणीटंचाईवर मात करावी, असे आवाहन पी. शिवाशंकर यांनी केले. ही वृक्ष लागवडीची मोहीम 1 जुलै ते 30 सप्टेंबर अशी 92 दिवस असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.प्रशासनाला मोठे आव्हान"दरम्यान, गेल्या काही वर्षातील परभणी जिल्ह्याची परिस्थिती पाहता, या ठिकाणी लोकांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागतो. यास जिल्ह्यात कायम होणारी वृक्षतोड आणि नव्याने होत नसलेले वृक्षारोपण कारणीभूत असल्याचे वारंवार सांगितले जाते. याचा परिणाम परभणी जिल्ह्यात अल्प प्रमाणात वनक्षेत्र शिल्लक राहिले आहे. परभणी जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६ लाख ४० हजार हेक्टर असून त्यापैकी केवळ १० हजार १४१ हेक्टरवर अर्थात १.६० टक्केच वनक्षेत्र आहे. चांगल्या वातावरणाच्या संतुलनासाठी ३३ टक्के क्षेत्रावर वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात आणखी ३१.५० भूभागावर वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आव्हान असून जिल्हा प्रशासन ते कसे पूर्ण करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परभणी पोलीस अधिक्षक कार्यालयात नांदेडचे परिक्षेञ महानिरिक्षक प्रकाशजी मुत्याल याच्या उपस्थितीत पोलीस व जनता सुसंवाद कार्यक्रम संपन्न

परभणी पोलीस अधिक्षक कार्यालयात नांदेडचे परिक्षेञ महानिरिक्षक प्रकाशजी मुत्याल याच्या उपस्थितीत पोलीस व जनता सुसंवाद कार्यक्रम संपन्न 

पुर्ण (प्रतिनिधी) 

परभणी येथिल पोलिस अधिक्षक कार्यालयात 29 जुन रोजी पोलीस व जनता सुसंवाद कार्यक्रम संपन्न झाला आसुन या वेळी नांदेडचे पोलीस परिक्षेञ महानिरिक्षक प्रकाशजी मुत्याल याच्या अध्यक्षखाली जनता सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आले

  तर पुढे मुत्याल म्हणाले की आज सोशल मिडिया वरून बातमीची सत्याता तपासुन पुढे व्हरल करावी,वतसेच युवकांनी सोशल मिडियाचा योग्य प्रकारे वापर करावा आणि युवकांनी सोशल मिडियावर तणाव व्हावा आसे काही पोस्ट करू नये.तर युवकांना योग्य दिशा देण्यासाठी नागरीकांनी पुढे आले पाहिजे.आसे मत महानिरिक्षक प्रकाश मुत्याल यानी मांडले

 या वेळी पोलीस अधिक्षक कृष्णाकांत उपाध्याय,अप्पर पोलीस अधिक्षक विश्व पानसरे,गुन्हे शाखाचे प्रविन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

  या वेळी पोलीस व जनता सुसंवाद कार्यक्रमाला मोठया संख्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी,पोलिस निरिक्षक,पोलीस कर्मचारी,जेष्ठ नागरीक,जेष्ठ पञकार बंधु हे उपस्थित होते

शनिवार, २९ जून, २०१९

माँबलिचिंग च्या विरोधात कडक कायदा करावा यामागणीसाठी पाथरी तहसिलवर विविध पक्ष संघटनेच्या वतीने मुक मोर्चा

*माँबलिचिंग च्या विरोधात कडक कायदा करावा यामागणीसाठी पाथरी तहसिलवर विविध पक्ष संघटनेच्या वतीने मुक मोर्चा*

लक्ष्मण उजगरे:-पाथरी प्रतिनिधी 

माँबलिंचिंग च्या विरोधात कडक कायदा करुण मुस्लिम समाजा बाबत मुस्लिम संरक्षण कायदा लागू करण्यात यावा यासाठी पाथरीतील विविध मुस्लिम सामाजिक संघटनांनी आज रोजी चौक बाजार ते तहसील कार्यालय मूक मोर्चा काढून तहसिलदार मार्फत राष्ट्रपती यानां निवेदन दिले. 

       

निवेदनात नमूद आहे की, देशातील सामाजिक वातावरण दुषित झाले असून फक्त संशया वरुण मुस्लिम समाज व अनुसूचित जाती जमातींना माँबलिओचिंग चे प्रकार वाढत असून या मध्ये निष्पाप लोकांचे बळी जात आहे आज भारता मध्ये गोमास भक्षणाच्या केवळ संषय व खोट्या आरोपा वरुण आणि आफवेवरूण निष्पाप लोकांचे ठेचूण हत्या होत आहेत अत्यंत निर्घृण असा पायंडा या समाजात पडत आहे. सध्याचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्या बंदीच्या नावाने मुस्लिम    समाजाला धारेवर धरण्याचा पायंडा पडला आहे पुणे येथील मोहसिन शेख या सॉफ्टवेअर इंजिनिअर ला माँबलिंचिंग करण्यात आले यु पी राज्यातील दादरी या ठिकाणचा मोहम्मद आखलागला गोमास खाल्याच्या कारणावरुण ठार केले उतराखंड, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, जम्मु महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडु, दिल्ली -मथुरा ,झारखंड आदी राज्यात मुस्लिम व अनुसूचित जाती जमातीं वर अन्याय होत असतानाच झारखंड राज्यातील तबरेज अंन्सारी या यूवकास चोरीच्या संशया वरुण खाबांला बाधूंन बेदम मारहाण करीत जय श्रीराम चे नारे देण्यास भाग पाडले हा सर्व घटणाक्रम भ्रमणध्वनी च्या कँमे-यात रेकॉर्ड करुण सोशलमिडीया वर प्रक्षेपण करण्यात आले जेणे करून मुस्लिम समाजात भितीचे वातावरण तयार केले देशात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही समाजकंटक माँबलिंचिंग वरुण करत असताना दिसत आहेत हे सर्व प्रकार त्वरित बंद करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली असून सदरील निवेदणावर मोहमद खमरोद्दीन नदवी जमात उलमा हिंद, मो न ई म अन्सारी वाहेदते ईस्लामी, शेख खुर्शीद राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, मूजिब आलम एम आय एम, मंचक हारकळ, दशरथ शिंदे ,मधुकर काळे ,अँड आशोक पोटभरे, वंचित बहुजन आघाडी, अजहर शेख महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठाण, अँड मूजाहेद अन्सारी, अँड तारेख अन्सारी, अँड समिर अन्सारी, अहेमद अन्सारी, र ईस खुरेशी नदिम तांबोली आदीच्या स्वाक्ष-या आहेत

पाथरी तालुक्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा;दुबार पेरणीचेही संकट

पाथरी तालुक्यात अजूनही पावसाची प्रतिक्षा;दुबार पेरणीचेही संकट


प्रतिनिधी/धम्मपाल उजगरे:-

पाथरी:-मृग नक्षत्र कोरडे गेल्या नंतर आर्द्रा नक्षत्रात तालुक्यात काही भागात मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले.अनेक शेतक-यांनी मजुरांची उपलब्धता होत नाही म्हणून धूळ पेरणी केली मात्र कमी पाऊस झाल्याने आता धूळ पेरणी वाया जात असून या शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे

.

शेतक-यांच्या पाठी संकटांची मालिका अजून ही सुरूच आहे. गेली पाच वर्षा पासून खंडवृष्टी मुळे आणि दुष्काळाचा सतत सामना करणारे शेतकरी या वर्षी मान्सूनच्या आगमनाची आतूरतेने वाट पाहात आहेत एप्रिल महिण्यातील ४८° सें. तापमानात भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या बातम्यांनी शेतकरी थंडाव्याची अनुभूती घेत या वर्षी तरी पाऊस वेळेवर आणि  समाधान कारक होईल ही अपेक्षा दर वर्षी ठेवतो गत आठवड्यात शुक्रवारी तालुक्याच्या अनेक भागात पाऊस झाला काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जोरदार बरसला कासापुरी भागात नदी नाले प्रथमच वाहिले.या पावसा मुळे धुळ पेरणी केलेल्या शेतातील बियाणे कोमेजले मात्र जमिनिची तृप्ती झालेली नसल्याने अंकूरलेले बियाने जळून जातांना दिसत आहे.या आठवड्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली मात्र विशिष्ठ ठिकाणीच तो पडत असल्याने शेतक-यां मध्ये चिंता दिसून येत आहे. आजही तालुक्याच्या दक्षिण भागात गुंज,उमरा,अंधापुरी,कान्सूर,लोणी,मसला,बाबूलतार,टाकळगव्हाण,जैतापुरवाडी,तुरा,सारोळा,पिंपळगाव,फुलारवाडी,विटा,लिंबा,वाघाळा,रेणापुर,पोहेटाकळी,या भागात आणि तालुक्यातील अन्य भागात अजून ही पेरणी योग्य पाऊस नाही या भागा लगतच असलेल्या मानवत तालुक्यातील केकरजवळा,इटाळी,रामेटाकळी,वझूर,हमदापुर,कुंभारी,वांगी भागतची परिस्थिती सारखीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.दोन दिवसा पासून पाऊस पुन्हा सुरू झाला मात्र लहरी पणाने पडत असल्याने शेतक-यांची चिंता तर वाढली आहे मात्र आता पिण्याच्या पाण्याचे संकट ही गंभिर बनत चालले आहे.राज्यात अनेक भागात दमदार पाऊस पडत असल्याच्या बातम्या एैकिवात येत असतांना पाथरी तालुक्या सह मानवत तालुक्याचा दक्षिण भाग खंड वृष्टीचा सामना करत आहे.पेरणी साठी किमान सत्तर मीमी पाऊस पडणे गरजे असल्याचे जाणकार सांगतात मात्र अजून ही पाऊस न झाल्याने शेतक-यांची तर चिंता वाढलीच मात्र आता पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चा-याचे संकट गडद होत चालले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

बुधवार, २६ जून, २०१९

पाथरी तालुक्यातील ईग्लीश स्कुल ने केली पालकांची लुट वाचा लवकरच आपल्या पंसतीच्या वेब न्युज पोर्टलवर (Voice parbhani) आवाज परभणीकरांच्या या पोर्टलवर आपल्या काही तक्रारी आसतील तर आम्हाला पुढील व्हाटस् अप नंबर वर कींवा मेलवर ujagarel7118@gmail आपल्या प्रतिक्रिया कळवा आपले नाव गोपनिय ठेवण्यात येईल. लक्ष्मम उजगरे-संपादक Voice parbhani-आवाज परभणीकरांचा

पाथरी तालुक्यातील ईग्लीश स्कुल ने केली पालकांची लुट वाचा लवकरच आपल्या पंसतीच्या वेब न्युज पोर्टलवर (Voice parbhani) आवाज परभणीकरांच्या या पोर्टलवर आपल्या काही तक्रारी आसतील तर आम्हाला पुढील व्हाटस् अप नंबर वर कींवा मेलवर ujagarel7118@gmail आपल्या प्रतिक्रिया कळवा आपले नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
          लक्ष्मम उजगरे-संपादक
Voice parbhani-आवाज परभणीकरांचा

पाथरी येथिल महाराष्ट्र बँकेत चोरीचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

बँकेत चोरीचा प्रयत्न करणारे दोघे गजाआड

पाथरी/प्रतिनिधी:-पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याच्या एप्रिल महिन्यात झालेल्या घटनेतील प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना गजाआड केले आहे़पाथरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये ९ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी बँकेच्या संरक्षण भिंतीवरून चॅनल गेटचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला होता़ आत जात असताना आरोपींनी नजरेस पडेल ते इलेक्ट्रीकल वायर कटरच्या सहाय्याने तोडले़ हे वायर तोडत असताना बँकेतील तिजोरीजवळ आरोपी आले व त्यांनी रॉडच्या मदतीने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला़ तर अन्य एक जण तिजोरी रुममधील इलेक्ट्रीक वायर तोडत असताना सेक्युरिटी आलार्म वाजला़ त्यानंतर आरोपी पळून गेले़ याबाबत व्यवस्थापक अजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात १० एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हे प्रकरण स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक प्रवीणे मोरे यांच्या अधिपत्याखालील स्थागुशाच्या पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली़ त्यात त्यांना फारशी माहिती हाती आली नाही़ त्यानंतर गोपनीय माहिती काढून त्यांनी यातील आरोपींचा शोध घेतला़ त्यानंतर २५ जून रोजी शेख अखिल शेख आजीम (२२, रा़ रहेमान नगर, पाथरी), शेख खुदबोद्दीन शेख शहादुल्ला (रा़ दर्गा मोहल्ला, पाथरी) या दोघांना पाथरी येथून ताब्यात घेतले़ त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत कौशल्याने विचारपूस केली असता, त्यांनी त्यांच्या इतर दोन साथीदारासोबत मिळून सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली़ त्यानुसार पोलीस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत़ ही कारवाई सपोनि शिवाजी देवकते, पोहेकॉ सुग्रीव केंद्रे, नीलेश भुजबळ, पोलीस नाईक जमीर फारुखी, किशोर चव्हाण, अरुण कांबळे, गणेश कौटकर, राजेश आगासे यांच्या पथकाने केली़ दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

सोमवार, २४ जून, २०१९

आ.विजय भांबळे यांनी परभणी जिल्ह्यातील प्रधानमंत्री कृषी* *सिंचन अनुदान देण्यासाठी,कृषी मंत्र्यांची घेतली भेट,कृषी मंत्री अनिलजी बोंडे यांनी संबंधित प्रधान सचिव यांना तत्काळ अनुदान वाटपाचे दिले आदेश.



*आ.विजय भांबळे यांनी परभणी जिल्ह्यातील  प्रधानमंत्री कृषी*  *सिंचन अनुदान देण्यासाठी*

*कृषी मंत्र्यांची घेतली भेट*.


*कृषी मंत्री अनिलजी बोंडे यांनी संबंधित प्रधान सचिव यांना तत्काळ अनुदान वाटपाचे दिले आदेश*.


जिंतूर  / निशाद आहेमद

 

 जिंतूर  आज दि.२४ जून रोजी आमदार विजय भांबळे यांनी कृषी मंत्री अनिलजी बोंडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एका निवेदनाद्वारे परभणी जिल्ह्यातील सिंचन अनुदान तत्काळ वाटप करण्याची मागणी केली. जिंतूर – सेलू मतदार संघासह  परभणी जिल्ह्यातील ५६२७ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत कृषी कार्यालय परभणी यांनी अनुदानासाठी पूर्व संमती दिलेली आहे. त्यापैकी ३१६५ शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळाले. उर्वरित २४६२ शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचनाचे अनुदान बाकी आहे. त्यासाठी लागणारा ३८७.४३ लक्ष रुपयाचा केंद्र शासनाचा निधी उपलब्ध आहे परंतु २५८.२९ लक्ष रुपयाचा राज्य शासनाच्या हिश्याचा निधी उपलब्ध नसल्यामुळे उर्वरित सर्व शेतकऱ्यांना अनुदान वाटप करणे शक्य होत नाही.  राज्य शासनाच्या हिश्याचा जिंतूर – सेलू मतदार संघासह परभणी जिल्ह्यासाठी  २५८.२९ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन संबंधितास शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ वाटप करण्यास आदेशित करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.


      यावेळी कृषी मंत्री अनिलजी बोंडे यांनी संबंधित खात्याच्या प्रधान सचिव यांना तत्काळ सिंचन अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्याचे आदेश दिले.  यावेळी आ.बाबाजानी दुर्रानी साहेब देखील उपस्थित होते.

मानवतच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे सखाहरी पाटील,आ़ मोहन फड यांचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध


मानवतच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे सखाहरी पाटील


मानवत /प्रतिनिधी- मानवत येथिल  नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील हे तब्बल ९ हजार ४३९ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या पूजा खरात यांचा दणदणीत पराभव केला आहे़ मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे सखाहरी पाटील, काँग्रेसच्या पूजा खरात आणि अपक्ष रतन वडमारे अशी तिरंगी निवडणूक झाली होती़ या निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी १०़३० वाजता जाहीर झाला़ त्यामध्ये भाजपाचे सखाहरी पाटील यांना १२ हजार २१० तर काँग्रेसच्या पूजा खरात यांना २ हजार ७७१ मते मिळाली़ अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांना २७३ आणि नोटाला १४३ मते मिळाली़ भाजपाच्या पाटील यांनी काँग्रेसच्या खरात यांचा तब्बल ९ हजार ४३९ मतांनी पराभव केला़निवडणूकनिर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हा निकाल जाहीर केला़ त्यानंतर भाजपाच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी आ़ मोहन फड, डॉ़ अंकुश लाड, विजयी उमेदवार प्रा़ सखाहरी पाटील, नगरसेवक बाबूराव हलनोर, गिरीष कत्रूवार, गणेश कुमावत, बालाजी कुर्हाडे, प्रभाकर वाघीकर, दत्ता चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख बालाजी दहे, मोहन लाड, गणेश कुमावत, राजू खरात, मुंजाभाऊ तरटे, किरण बारहाते आदींची उपस्थिती होती़ 


आ़ फड यांचे पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध - 


मानवत नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे़ ही नगरपालिका आ़ मोहन फड यांच्या ताब्यात आहे़ येथील नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने जुलै २०१८ मध्ये रद्द केले होते़ त्यानंतर त्यांना नगराध्यक्ष पदासाठी अपात्र ठरविले होते़ त्यामुळे स्वामी या न्यायालयात गेल्या होत्या़ न्यायालयीन प्रक्रियेच्या आधीन राहून नगराध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता़ त्यानुसार तब्बल ९ महिन्यानंतर या पदासाठी पोटनिवडणूक झाली़ नगराध्यक्षा स्वामी या पूर्वी शिवसेनेकडून निवडून आल्या होत्या़ आ़ मोहन फड हेही शिवसेनेत होते़ त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर भाजपाकडून पहिल्यांदाच ही निवडणूक लढविण्यात आली़ त्यामध्ये आ़ फड, डॉ़ अंकुश लाड यांनी शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा राबविली़ त्या तुलनेत काँग्रेसची यंत्रणा फारशी सक्रिय नव्हती तर राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत मैदानातच उतरली नाही़ शिवसेनेने येथे उमेदवार दिला होता; परंतु, नंतर राज्यस्तरावरून सुत्रे हलली आणि शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली़ त्यानंतर प्रा़ पाटील यांनी युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली आणि त्यामध्येत्यांनी एकतर्फी विजय मिळवित काँग्रेसचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळविले़ सोनपेठमध्ये अपक्ष खरात विजयी सोनपेठ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ब मधील पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार लक्ष्मण खरात यांनी ४९५ मतांनी विजय मिळविला़ त्यांनी अपक्ष उमेदवार सुशील सोनवणे यांचा ४९५ मतांनी पराभव केला़ सोनपेठ नगरपालिका अधिकृतरित्या काँग्रेसच्या ताब्यात आहे़ येथे भाजपाने निर्मला चव्हाण यांना उमेदवारी दिली होती़ परंतु, वेळेवर पक्षाचा एबी फॉर्म आला नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला़ त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली़ त्यात त्यांना फक्त ११७ मते मिळाली़

रविवार, २३ जून, २०१९

जिंतूरच्या सायकल सवारांनी मंठ्यात दिला एकतेचा संदेश, मंठा पोलीस दलातर्फे सायकल सवारांनाचा गौरव ,70 कि.मी. लांब पाल्याचा प्रवास सायकलने केला पूर्ण

जिंतूरच्या सायकल सवारांनी मंठ्यात दिला एकतेचा संदेश

* मंठा पोलीस दलातर्फे सायकल सवारांनाचा गौरव

* 70 कि.मी. लांब पाल्याचा प्रवास सायकलने केला पूर्ण

जिंतूर  / निशाद आहेमद 

      जिंतूर  येलदरी सायकल स्वार समूहातील विविध जाती धर्माच्या दहा सायकल पट्टूनी एकत्रितपणे सामाजिक, धार्मिक सद्भावना निर्माण करण्यासाठी जिंतूर-मंठा-जिंतूर असा तब्बल 70 कि.मी. चा प्रवास सायकलने पूर्ण करून सामाजिक, धार्मिक सद्भावना एकता रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवून एकतेचा संदेश दिला. यावेळी मंठा पोलीस दलातर्फे सायकल समूहातील सदस्यांचा गौरव करण्यात आला. 

           जिंतूर शहर व परिसरात वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुदृढ शरीर संपत्ती निर्मिती करण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिंतूर शहर व येलदरी येथील सायकल पट्टू मागील दोन वर्षापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी याकरिता जिंतूर येथे भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करून जनजागृती केली. आणि रविवारच्या सुट्टीचा सदुपयोग म्हणून सायकल समूहातील दहा सदस्यांनी जिंतूर-मंठा-जिंतूर असा तब्बल 70 किमीचा प्रवास सायकलवर करून मंठा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात सामाजिक, धार्मिक सद्भावना एकता रॅलीत सायकल पट्टूनी सक्रिय सहभाग नोंदवून एकतेचा संदेश दिला. यावेळी मंठा येथील नागरिक तसेच पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी सायकल स्वारांचा गौरव केला. सायकल समूहाच्या या अभिनव उपक्रमात प्रमोद भालेराव,  व्यंकटेश भुरे, शिवा साखरकर, शेख अलीम, शाम चव्हाण, महेश डासाळकर, यासीन खान,  प्रेम मेनकुदळे  शहेजाद खान,  या सायकल सवारांचा समावेश होता.

जिंतूर तालुक्यातील भूसंपादन प्रकरणी जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस

जिंतूर तालुक्यातील भूसंपादन प्रकरणी जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस


45 दिवसात उत्तर देण्याचे दिले आदेश

जिंतूर  / प्रतिनीधी-तालुक्यातील सावरगाव,वझर,असोला,पिंपळगाव काजळे आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी जुन्या रोजगार हमी योजने अंतर्गत पाझर तलावांसाठी संपादित करण्यात आल्या होत्या मात्र मागील अनेक वर्षांपासून जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यातच जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकारी मागील दोन वर्षांपासून वेगवेगळी कारणे देऊन शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत त्यामुळे सदरील गावातील शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्यात आली होती यावेळी 17 जून रोजी झालेल्या सुनावणी अंती जिल्हाधिकारी,भूसंपादन अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या असून 45 दिवसात उत्तर सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठाने दिले आहेत.


याबाबत सविस्तर माहिती अशी की,जिंतूर तालुक्यातील सावरगाव,वझर,असोला,पिंपळगाव काजळे व सेलू तालुक्यातील राव्हा या गावातील शेतकऱ्यांच्या जमीनी रोजगार हमी योजने अंतर्गत पाझर तलावासाठी सण 2007- 2008 मध्ये संपादित करताना तडजोडी पत्रावर सह्या घेऊन जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या सदरील तडजोड पत्रामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले होते की जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेतल्यापासून भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार जमिनीच्या ठरलेल्या किंमतीवर दरसाल दर सेकडा 6 टक्के दराने भुभाडे देण्यात येईल व भाडे भरपाईची अंतिम रक्कम ठरवे पर्यंत 4 टक्के रक्कम तात्पुरते भुभाडे देण्यात येईल मात्र 2007 - 2008 मध्ये जमिनी ताब्यात घेऊन कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली नाही दरम्यान राज्य सरकारच्या 1 जुलै 2017 चा पत्रानुसार अंतिम निवाडा सादर करताना सदरील जमिनीची स्थळ पाहणी करून पंचनामा सह अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशावरून दोन वर्षात चारवेळा पंचा समक्ष स्थळ पाहणी करण्यात आलेली आहे तरीही भूसंपादन अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी भूभाडे व जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही केली नाही शेतकऱ्यांनी वेळोवेळी अर्ज निवेदन देऊन विनंत्या केल्या मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी व भूसंपादन अधिकाऱ्यांनी कोणतीच दखल घेतली नाही म्हणून संबंधीत शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठात अँड युवराज बारहाते यांच्या मार्फत रिट याचिका दाखल केली होती सदरील याचिकेवर सुनावणी होऊन प्रतिवादीना नोटीस जारी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून 13 ऑगस्ट रोजी प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे या याचिकेत एक महिण्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून मोबदला द्या, ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामूळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे त्याची भरपाई संबंधीतांकडून वसूल करण्यात यावी व दोषी अधिकारी व कर्माच्याऱ्यांची विभागीय चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी अँड युवराज बारहाते शेतकऱ्यांच्या वतीने बाजू मांडत आहेत

शनिवार, २२ जून, २०१९

ओंकार सेवाभावी संस्थेचे डॉ. जगदीश शिंदे यांचा सामाजिक उपक्रम,पाथरीत गुरवारी भव्य रोजगार मेळावा,जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी भव्य रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे:-जागदीश शिंदे

ओंकार सेवाभावी संस्थेचे डॉ. जगदीश शिंदे यांचा सामाजिक उपक्रम.

*पाथरीत गुरवारी भव्य रोजगार मेळावा*


*जास्तीत-जास्त सुशिक्षित बेरोजगारांनी भव्य रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे:-जागदीश शिंदे*

  

पाथरी/प्रतिनिधी:-सामाजिक कार्यात सातत्य राखत सतत नवनविन उपक्रम राबवत समाजाला काहितरी देण्याच्या उद्देशाने पाथरी शहरातील नामवंत बालरोग तज्ञ डॉ जगदिश शिंदे हे सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत गत वर्षी आयोजित केलेल्या रोजगार मेळ्याव्यात अनेकांना  विविध खाजगी कंपनीत डॉ शिंदे मुळे रोजगार उपलब्ध झाला या नंतर पुन्हा २७ जुन गुरूवार रोजी पाथरी शहरातील महेबूबशहा फंक्शन हॉल येथे सकाळी साडे आठ ते सायंकाळी पाच या वेळेत सुशिक्षित बेरोजगारां साठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ जगदिश शिंदे यांनी दिली.

पाथरी तालुक्या सह जिल्हा आणि मराठवाड्यात सतत दुष्काळी परिस्थिती गेली चार पाच वर्षा पासून कायम आहे.अशा परिस्थितीत शेती पिकत नाही.शेतीचे तुकडे झालेले आहेत कुटूंबातील अनेक सदस्य काम नसल्याने हताश होत आहेत.शिकली सवरली मुलं बेरोजगार आहेत.काहिंना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.त्या साठी डॉ जगदिश शिंदे यांच्या वतिने गुरूवार २७ जुन रोजी पाथरी शहरातील महेबूबशहा फंक्शन हॉल येथे सकाळी साडे आठ ते पाच या वेळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून देश विदेशातील जवळपास १०८ कंपण्यां मध्ये युवकांना  नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.यात अल्पशिक्षित, दहावी, बारावी, पदविधर, डिप्लेमा धारक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे डॉ जगदिश शिंदे यांनी सांगितले.या पुर्वीच्या रोजगार मेळाव्यात अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती.कमीत कमी नऊ हजार रुपयां पासून पुढे प्रती माह मानधनावरील नौकरीची संधी या रोजगार मेळाव्यात उपलब्ध होऊ शकते.पाथरी,मानवत,सोनपेठ,माजलगाव,सेलू,जिंतूर या सह जिल्हाभरातील युवकांनी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त करावी असे आवाहन डॉ जगदिश शिंदे यांनी केले आहे.या साठी विविध कंपन्यांचे पदाधिकारी याच ठिकाणी निवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अवैध प्रवासी वाहतुकीचा बळी,भरधाव जीप च्या टपावरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

अवैध प्रवासी वाहतुकीचा बळी,भरधाव जीप च्या टपावरून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू ,आत्ता तरी वाहतुक पोलीस जागे होणारका?

जिंतूर /  प्रतिनिधी:-निशाद अहेमद 

 तालुक्यातील येलदरी येथिल काम आटोपून परत आपल्या गावाकडे खोलगाडगा येथे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका कमांडर जीपने परत जात असलेल्या शेतकऱ्याचा रस्त्यात जीप च्या टपावरून खाली पडून मूर्त्यु झाल्याची घटना शनिवार दि 22 जून रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली 

या बाबत अधिक वृत्त असे की तालुक्यातील खोलगाडगा येथील राहणार अंकुश बाबाराव बांगर वय 50 वर्ष हे काही कामा निमित्त येलदरी येथे आले होते शुक्रवारी रात्रीचया सुमारास मृगाचा पहिला जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे  बाजारपेठेत खरेदी करून व इतर काम आटोपून दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास ते खोलगाडगा यथे परत जाण्यासाठी बस स्थानकावर आले .परंतु या वेळेस बस नसल्यामुळे ते अवैध अवैध प्रवासी वाहतूक करणारी कमांडर जीप क्रमांक एम.एच.17 सी 1522 जवळ गेले ही जीप प्रवाशांनि फुल्ल भरलेली असल्याने ते जीप च्या टपावर बसून  प्रवास करीत असताना येलदरी पासून 1 किमी अंतरावर सदरील जीप च्या चालकाने आपली जीप भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवल्यामुळे बांगर हे जीप टपावरून खाली पडून गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जिंतूर शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले

ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्यामुळे एस टी महामंडल बस फेऱ्या वाढवत नाही त्यामुळे नागरिकांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा आधार घ्यावा लागतो व त्यामुळे अपघातात जीव गमवावा लागतो

पाथरी येथे भ्रमनध्वनी वरुन मटका तेजीत;एका मिसकाॅलवर मटका ऐजेंट ग्राहका पर्यंत,पाथरी पोलीस यांंचा बंदोबस्त करणार का?

*पाथरी येथे भ्रमनध्वनी वरुन मटका तेजीत;एका मिसकाॅलवर मटका ऐजेंट ग्राहका पर्यंत*

 

*पाथरी पोलीस यांच्या बदोबस्त करणार का?*


पाथरी/लक्ष्मण उजगरे:पाथरी शहरासह संपुर्ण तालुक्यामध्ये अवैध समजला जानारा कल्यान मुंबई नावाचा मटका भ्रमनद्वनी द्वारे घेतला जात असुन ग्राहकाच्या एका मिसकाॅलवर ऐजेंट काही क्षनात ग्राहका पर्यत पोहचत आहे

परभणी पोलीस अधिक्षक यांनी अवैध धंद्या विरोधात धडक मोहीम उघडली आसल्या मुळे मटका माफीयाच्या गोटात खळबळ उडाली होती परंतु मटका माफीयांनी शक्कल लढवत नामांकीत व्यावस्थापन संस्थेलाही लाजवेल असी शक्कल लढवत भ्रमनध्वनी वरुन मटका घेण्यास सुरुवात केली आहे ग्राहाकाच्या एका मिसकाॅलवर मटका ऐजंट आगदी काही क्षनात थेट ग्राहका पर्यंत पोहचत आसुन मटक्याची सेवा देत आहेत या आती जलद  सेवेमुळे मानवत,माजलगाव,सेलु व सोनपेठ येथील मटका शौकीन व मटका ऐजंट पाथरी येथे मटका लावण्यासाठी व मटका घेण्यासाठी येत आहेत पाथरी तालुक्यातील मौजे तुर्रा या गावातीलच जवळपास पाच ते सहा ऐजेंट आहेत आणी ते थेट पुणे येथील मटका बुकीसी संबधीत आहेत आसे ग्रामस्थामध्ये  चर्चा आहे हेच मटका ऐजेंट पाथरी शहरा मध्ये ही मटका घेत आहेत या मुळे पाथरी शहरातील मटका ऐजंट,माजलगाव तालुक्यातील मटका ऐजंट या तिन ठिकान च्या मटका ऐजंट मध्ये आनेक वेळेस राडा झाला आहे या सर्व प्रकारामुळे शहरामध्ये मोठा

घात -पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पाथरी तालुक्यातील हदगाव,बाभळगाव,गुंज,तुर्रा तर पाथरी शहरातील पशु वैधकीय दवाखाना,बस स्थानक परिसर,कृर्षी उत्पन्न बाजार समीती व पंचायत समीती पाथरी परिसर या भागा मध्ये मटका ऐजेंट चा आड्डाच झाले आहेत या कडे संबधीत प्रशासन लक्ष देवुन मटका माफीयाचे आड्डे उदवस्त करेल का? हाच मोठा प्रश्न नागरीकांन मधुन विचारला जात आहे

पूर्ववैमनस्यातून एकाचा खून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील घटना

पूर्ववैमनस्यातून एकाचा खून दोघां विरुद्ध गुन्हा दाखल जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील घटना 


जिंतूर / निशाद अहेमद 

मोठ्या भावाचे दुसरे लग्न लावून देण्यास मदत करणाऱ्या लहान भावाचा पूर्ववैमनस्यातून पुतण्याने व त्याच्या पत्नीने मिळून धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील येलदरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर घडली.


 याबाबत अंबादास पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून  दोघा विरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे


 याबाबत अंबादास पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की त्यांनी काही वर्षापूर्वी दुसरे लग्न केले होते हे लग्न त्यांचा लहान भाऊ मधुकर पावडे यांनी लावून देण्यात मदत केल्याचा संशय नातेवाईक व इतर भावांमध्ये होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबात नेहमीच वाद होत असे या वादाला कंटाळून अंबादास पावडे, मधुकर पावडे हे दोघे बंधू काही वर्षांपूर्वी येलदरी सोडून पाथरी येथे राहावयास गेले त्यांची शेती येलदरी पासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिकलागार या गावात आहे दिनांक 20 जून रोजी शेतीतील उसाचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खात्यावर जमा झाल्याचे त्यांना कळाले त्यावरून दोघे भाऊ येलदरी येथे आले रात्री परत जाण्यास उशीर  झाल्याने ते चिखलागार येथे त्यांच्या शेतीचा बटाईदार विठ्ठल चव्हाण यांच्या घरी दोघा भावांनी मुक्काम केला शुक्रवार दि 21 जून रोजी सकाळी विठ्ठल चव्हाण यांचा दुचाकीवर बसून चिखलागार येथून जिंतूर कडे जात असताना पावणे दहा वाजण्याच्या सुमारास येलदरी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर त्यांच्या दुचाकीस पाठीमागून एकनाथ अंबादास पावडे याने आटोने जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार दोघे भाऊ खाली पडले असता एकनाथ पावडे याने हातातील धारदार शस्त्राने मधुकर पावडे यांच्या पोटावर,छातीवर जोरदार वार केले तर पद्माबाई पावडे यांनी अंबादास पावडे यांना जबर मारहाण केली यावेळी इतर नागरिक घटनास्थळी जमा झाल्याने हल्लेखोर एकनाथ पावडे, पद्माबाई पावडे यांनी तेथून पळ काढला गंभीर जखमी झालेल्या मधुकर पावडे  यांच्यावर प्राथमिक येलदरी च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचार करून पुढील उपचारासाठी दाखल केले असता तिथेच निधन झाले याबाबत अंबादास पावडे यांच्या फिर्यादीवरून एकनाथ पावडे, पद्माबाई पावडे या दोघां विविध जिंतूर पोलीस स्थानकात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

“आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून मौजे आसेगाव ता.जिंतूर येथे ब्रेस्ट कँसर व युटेरीन कँसर तपासणी व मोफत उपचार शिबिरास महिलांचा प्रचंड प्रतिसाद.”

“आ.विजय भांबळे यांच्या प्रयत्नातून मौजे आसेगाव  ता.जिंतूर येथे ब्रेस्ट कँसर व युटेरीन  कँसर तपासणी व मोफत उपचार शिबिरास महिलांचा प्रचंड प्रतिसाद.”


जिंतूर / शेख निशाद अहमद

 जिंतूर/सेलू विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी मजूर गरीब होतकरू महिलांना वेळे अभावी आरोग्याकडे लक्ष देणे होत नाही. तसेच लाजेपोटी अनेक महिला गंभीर आजार लपवतात तर अनेक महिलांना उपचार परवडणारे नसल्याने सदर महिला ब्रेस्ट कँसर (स्तनाचा कर्करोग)व युटेरीन  कँसरकडे (गर्भ पिशवीचा कर्क रोग)दुर्लक्षित करत असतात. त्यामुळे महिलांचे आरोग्य बिघडत जाते.


            त्यामुळे आ.विजय भांबळे यांनी महिलांची समाजसेवा करण्या हेतूने मोफत ब्रेस्ट कँसर व युटेरीन  कँसरचे शिबीर आज दि. २१ जून रोजी मौजे आसेगाव येथे आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद होता. यावेळी 500 महिलांची तपासणी करण्यात आली तर 4०  कँसर ग्रस्त महिला आढळून आल्या. त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे.


            यावेळी तज्ञ डॉ.परीक्षित ठाकूर (कर्करोग तज्ञ, दीपक हॉस्पिटल जालना), डॉ.निरंजन जहांगीरदार (कर्करोग तज्ञ), डॉ.पनाड (कर्करोग तज्ञ), डॉ.शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी परभणी), डॉ.बोराळकर (तालुका अधिकारी जिंतूर) यांनी काम पाहिले.


यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.आ.विजय भांबळे साहेब (जिंतूर सेलू विधानसभा) हे उपस्थित होते. शिबिराचे अध्यक्ष मा.सौ.उज्वलाताई राठोड (जि.प.अध्यक्षा), तर प्रमुख पाहुणे मा.सौ.इंदुमतीताई भवाळे (पं. स. सभापती जिंतूर), विजय खिस्ते (उपसभापती पं.स.जिंतूर), शालिनीताई राऊत (जि.प.सदस्या), मनोज थिटे (तालुकाध्यक्ष जिंतूर), प्रसादराव बुधवंत (विधानसभा अध्यक्ष जिंतूर – सेलू), रेखा संतोष भवाळ (पं.स.सदस्या) यांच्यासह अभिनय राऊत, सौ.सीमा पवार, विश्वंभर पवार,पांडुरंग पवार, राजेंद्र नागरे, उद्धवराव पवार, नागोराव गिराम, विष्णू पोंदाळ, भास्कर घुगे, सचिन राऊत, प्रकाश शिंदे, माउली गलांडे, बबलू कदम ई.उपस्थित होते.

मंगळवार, १८ जून, २०१९

कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथे गोदामाचे भूमिपूजन

            *कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी येथे गोदामाचे भूमिपूजन*

                              पाथरी/प्रतिनिधी:-आज दी-18/06/2019 रोजी राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात 1000 में. टन क्षमता असलेले गोदाम 35.5 ×18 मीटर चे व धान्य चाळणी यंत्र 14×14 मीटर प्रकल्पाची शेड उभारणी कामाचे भूमिपूजन ह.भ.प.1008 श्री महामंडलेश्वर मनिषानंद पुरीजी महाराज रुढीकर यांच्या शुभ हस्ते  करण्यात आले. या प्रसंगी चक्रधरराव उगले माजी सदस्य जि. प.परभणी,अनिलराव नखाते सभापती कृ.ऊ.बा. समिती पाथरी,संचालक सर्व लहू घांडगे,भागीरथ टाकळकर,विश्वाम्बर साळवे,स.गालेब,बाळासाहेब कोल्हे, हन्नान खान दुर्राणी उपनगराध्यक्ष पाथरी,गणेश पाटील पणन मंडळाचे इंजिनियर,बी.एस. कुटे सचिव,विकास घुंबरे,कैलास राठी,आर्किटेक अभिजित पठारे, व गुत्तेदार सुदर्शन कन्स्ट्रक्शन सदरील कामे 1 कोटी 65 लाखाचे असून सदरील कामास मा.आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या सहकार्याने मंजुरी मिळाली आहे व  हे काम लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या मालाची चाळणी व प्रतवारी होऊन,धान ठेवण्यासाठी गोदामात व्यवस्था होणार आहे.तसेच शेतमाल तारण कर्ज योजनेसाठी गोदामाचा वापर करता येणार आहे.यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.

रविवार, १६ जून, २०१९

तरुणाला भर रस्त्यात पेटऊन दिल्या प्रकरणी पाच आरोपी ताब्यात .

तरुणाला भर रस्त्यात पेटऊन दिल्या प्रकरणी पाच आरोपी ताब्यात .


दोन दिवसात आरोपी पकडले

 सेलू पोलिसांची कामगिरी 

परभणी प्रतिनिधी/लक्ष्मण उजगरे

     जिल्ह्यातील सेलू  तालुक्यातील ब्राह्मणगाव येथिल युवक सतीश बरसाले यास  जिवंत जाळल्याची  घटना शनिवार दि 15 जुन रोजी घडली होती. परिसरात या खुनाने खळबळ माजली होती .या प्रकरणी गुप्त माहिती अधारे सेलू पोलीसांनी पाच आरोपीना तालुक्यातील देवगाव फाटा येथून घटनेच्या दुसऱ्या दिवशी  रविवारी  अटक केली आहे.

 शनिवारी सतीश वालुर हुन सेलूकडे जात असताना आरोपींनी  रस्त्यामध्ये अडून पेटवून दिले होते .याप्रकरणी आरोपी विरोधात सेलू पोलीस ठाण्यात  कलम 302,143,147,148 नुसार गुन्हा दाखल झाला होता .

दरम्यान पोलिसांना  प्रकरणातील आरोपी उध्दव खोक्षे , जिवन खोक्षे, दिगांबर खोक्षे, दत्ता खोक्षे  सर्वजण रा .ब्राम्हणगाव ता.सेलू यांना देवगाव फाटा येथून ताब्यात घेतले आहे .

 सदरील कार्यवाही पोलीस अधिक्षक कृष्णकांत अपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी  एकबोटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक शेळके, सहपोलीस निरिक्षक रामोड, सहपोलीस उपनिरिक्षक लोकुलवार, अप्पा वराडे यांनी केली .

प्रा.अनिल उजगरे यांचा स्तुत्य उपक्रम,मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहावी,बारावी उतिर्ण विद्यार्थ्यांचा आयोजित केला गुणगौरव सोहळा*



प्रा.अनिल उजगरे यांचा स्तुत्य उपक्रम,मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दहावी,बारावी उतिर्ण विद्यार्थ्यांचा आयोजित केला गुणगौरव सोहळा


लक्ष्मण उजगरे/पाथरी :-पोहेटाकळी येथिल उच्च शिक्षीत प्रा.अनिल उजगरे यांनी आपला मुलगा आरव याच्या वाढदीसानिमित्त गावातील उतिर्ण झालेले दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शाळेत विविध मार्गाने शाळेला मदत करणारे पालक,शाळेतील झाडांना  उन्हाळ्यात जगवण्यासाठी जलदाते म्हणुन लाभलेल्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.हा उपक्रम राबवुन प्रा.अनिल उजगरे यांनी उच्च शिक्षीत पालकासमोर एक आदर्श निर्मान केला आहे.या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती शाळेचे शिक्षक,गावचे सरपंच,शालेय व्यस्थापन समितीचे सदश्य उपस्थित राहणार अहल्याची माहीती प्रा.अनिल उजगरे यांनी दीली आहे व आपन सर्वांनी उपस्थित राहण्याचे अव्हाहन केले आहे

शनिवार, १५ जून, २०१९

रविवारी परभणीत ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा

रविवारी परभणीत ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा
परभणी/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आयोजीत जेष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा रविवार दि.16 जून 2019 रोजी गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय पूर्णा  येथे आयोजित करण्यात आला आहे. 
यावेळी उद्घाटक म्हणून सिताराम सोमा धानू, मुंबई (अध्यक्ष  : श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर, पाथरी),  तर अध्यक्ष : सौ.गंगाबाई सिताराम एकलारे (नगराध्यक्षा, पुर्णा) यांची तर विशेष अतिथी म्हणून मा.राहुलजि गडपाले ( मुम्बई)   दैनिक सकाळ  समूह सम्पादक, विनोद राऊत (इनपुट एडिटर : जय महाराष्ट्र न्युज चॅनल, मुंबई),हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सत्कार मुर्ती मदन कोल्हे (संपादक, सा.धर्मभुमी), आश्रोबा केदारे (संपादक, सा.कृपावंत) यांना सन्मानित केल्या जाणार आहे. 
प्रमुख पाहूणे म्हणून विश्वासराव आरोटे (राज्य सेव्रेटरी म.रा.म.प.सं.), मा.वसंत मुंढे (कार्याध्यक्ष, म.रा.म.प.सं.), मा.बाबाजानी दुर्राणी (आमदार,पाथरी),मा.आ.राहूल पाटील (आमदार, परभणी), मा.डॉ.मधुसुदन केंद्रे (आमदार, गंगाखेड), मा.संतोष मुरकुटे (संतोषभाऊ मित्र मंडळ, गंगाखेड), मा.आ.सितारामजी घनदाट (अध्यक्ष, अभ्युदय बँक,मुंबई), मा.रणधिर कांबळे (अध्यक्ष, वृत्तपत्र व वृत्त वाहिणी संघ), मा.सितारामजी एकलारे (अध्यक्ष, व्यापारी महासंघ,पुर्णा), मा.जलालोद्दीन काजी (मा.विरोधी पक्ष नेता मनपा, परभणी), मा.संतोष एकलारे (मा.नगर सेवक, पुर्णा),  संजय भुसारी  विश्वस्थ साईबाबा जन्मस्थान पाथरी, अतुल दिनकरराव  चौधरी  ( कार्यकारी  विश्वास्थ श्री साई बाबा जन्म स्थान पाथरी) ,गुल्मिर खान (म.न.पा. सदस्य परभणी),चौधरी साहेब  (सभापती बोरी कृषि उत्पन्न बाजार समिती) ,  मारोति मामा पिसाळ (जेष्ठ  नेते)  बालाजी देसाई  (सभापती,कृषि उत्पन्न बाजार समिती  पूर्णा),  आदिंची उपस्थिती राहणार आहे . दोन सत्रात कार्यक्रम होणार असून सकाळी १० ते १. ३० वेळात  उदघाटन  व सत्कार सोहळा  तर दुपारी २. ३० ते ५ या वेळात मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत . या सोहळ्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाश साळवे (जिल्हाध्यक्ष), विजयकुमार कुलदिपके (जिल्हाध्यक्ष, वृत्तवाहिनी), यांनी केले आहे.

कौसडी ग्रा.पं.च्या ग्रामसेविका निलंबीत कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप ; आर्थिक अनियमितता भोवली


*कौसडी ग्रा.पं.च्या ग्रामसेविका निलंबीत कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप ; आर्थिक अनियमितता भोवली*

परभणी/प्रतिनिधी ः कौसडी येथील महिला ग्रामसेविकेने ग्रामपंचायत कार्यालयाचे संयुक्‍त खाते न उघडता परस्पर स्वतःचे खाते काढून घेत कर्तव्यात कसुर केल्याचा आरोप झाला. तसेच यातून मोठी आर्थिक अनियमितता केल्याचे उघड झाल्याने मंगळवारी (दि.11) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे. 
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला मिळणार्‍या विविध शासकीय योजनांच्या निधीसाठी ग्रामसेवक व सरपंच यांचे संयुक्‍त बँक खाते असणे बंधनकारक आहे. पण तेथील ग्रामसेविका ए.जी.गोरे यांनी तसे न करता केवळ स्वतःचे बँक खाते उघडल्याचे उघड झाले आहे. सदर खाते हे  बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत उघडलेले आहे. या खात्यावर ग्रामपंचायतीला मिळणार्‍या विविध योजनांचा निधी वर्ग केलेला आहे. तो कोणालाही विचारात न घेता परस्पर उचलुन आर्थिक अनियममितता केल्याचे सीईओंच्या निदर्शनास तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची सर्व शहानिशा करण्यात आल्यानंतर ग्रामसेविका ए.जी.गोरे यांच्या कारभाराविषयी संशय निर्माण झाल्याने सीईओ बी.पी.पृथ्वीराज यांनी मंगळवारी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात असे नमुद केले की,ग्रामसेविका गोरे यांना निलंबन कालावधीत परभणी येथील पंचायत समिती कार्यालय हे मुख्यालय म्हणून दिलेले आहे. तसेच त्या अर्धवेतनी रजेवर गेल्या असत्या तर त्यावेळी जेवढी रक्‍कम मिळाली असती तेवढी रक्‍कम निर्वाह भत्‍ता म्हणून त्यांना देण्यात येणार असल्याचेही नमुद केले आहे. एवढेच नाही तर महागाई भत्‍ता हा नियमाप्रमाणे निर्वाह भत्‍ता याप्रमाणे देण्यात येणार आहे. तसेच पुर्व परवानगीशिवाय दिलेले मुख्यालय त्यांनी सोडू नये असेही आदेशात म्हटले आहे. त्यांना या निलंबन आदेशात दिलेल्या कोणत्याही एका अटीचे उल्‍लंघन करता येणार नाही तसे झाल्यास दिला जाणारा निर्वाह भत्‍ता त्यांना मिळणार नाही असेही कळवले आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्याकडून परिचारिकेचे लैंगिक शोषण, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

*वैद्यकीय अधिकाऱ्याकडून परिचारिकेचे लैंगिक शोषण, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार*

परभणी/लक्ष्मण उजगरे
जिंतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य येलदरी केंद्रांतर्गत उपकेंद्र पिंपळगाव (का) येथे कार्यरत असलेल्या एका परिचारिकेवर वैद्यकीय अधिकारी डॉ. तौसीफ हुसेन अन्सारी यांनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार आज एका निवेदनाद्वारे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सदरील परिचारीकेने आपल्या तक्रारीत डॉ. तौसीफ अन्सारी यांच्याविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. तसेच या डॉक्टरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही या परिचारीकेने केली आहे. आपल्या या तक्रार वजा निवेदनाच्या प्रती परभणी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, आरोग्य उपसंचालक संभाजीनगर यांना पाठविल्या आहेत.

जिंतूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येलदरी येथे मागील अडीच वर्षापासून सदर महिला परिचारिका म्हणून काम पाहते. येथे काम करत असताना डॉ. तौसीफ अन्सारी यांनी वेळोवेळी महिलेस अडवणूक करत शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला असून रात्री-बेरात्री कॉल करून बोलावून शारीरिक संबंधांची मागणी केली. सतत मागील 2 वर्षांपासून परिचारिकेचे लैंगिक शोषण झाले असून तिने नकार दिला असता, तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी डॉ. तौसीफ अन्सारी वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली.

*पीडितेचा आत्महत्या करण्याचा होता मानस*
डॉ. तौसीफ अन्सारी याच्या नेहमीच्या छळाला कंटाळून परिचारिका या फाशी घेणार होती. 3 जून 2019 रोजी या परिचारिकेची रात्रपाळी होती. दुसऱ्या दिवशी सुटीचा वार होता. दुपारी बोलावून घेऊन डॉ. तौसीफ अन्सारीने ‘आता मला तुझी गरज नाही, माझे लग्न झालेले आहे. तू आता क्वॉटर खाली कर, असे म्हणत मुख्यालय सोडण्याचे आदेश दिले. ते आदेश हातात घेऊन परिचारिका रडू लागली. तातडीने परिचारिकेने क्वॉटरमध्ये जाऊन फाशी घेण्यासाठी छताला दोर बांधत होती. याचवेळी काही लोकांनी तिला पाहिले. तिचा सोबत असलेला 4 वर्षांचा मुलगा यावेळी रडू लागला. पर्यवेक्षक कऱ्हाळे यांनी तातडीने तिला फाशी घेण्यापासून परावृत्त केले. या प्रकारानंतर अन्सारी यांनी नौकरीवरून काढून टाकण्याची व पुढची आर्डर मिळू देणार सतत धमकी दिली. ‘तु कुठेही जा, माझे काहीही होत नाही.’ असेही बजावले.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ:पाथरीतील इंटरनॅशनल बोगस शाळेचा पर्दाफाश

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ:पाथरीतील इंटरनॅशनल बोगस शाळेचा पर्दाफाश



 लक्ष्मण उजगरे/पाथरी :– पाथरी येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कूल या शाळेला शासनाची मान्यता नसताना ही गेल्या दोन वर्षापासून बनावट दस्तऐवजच्या आधारे बोगस शाळा चालवून पालकांची दिशाभूल करत विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश देऊन फसवणूक केल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी अधिकारी विश्वास खोगरे यांच्या फिर्यादीवरून संस्था चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे शाळेत प्रवेश घेतलेल्या 164 विद्यार्थीचे भवितव्य अंधारात आले आहे.

 

पाथरी येथील डॉक्टर सलीम मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन संचलित आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे, सध्या या शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत , या शाळेला शासनाची मान्यता नसल्याची तक्रार पाथरी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल साळवे यांनी शिक्षण विभागाकडे केली होती या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी पाथरी यांनी या शाळेच्या मान्यतेबाबत चौकशी करून वरिष्ठाकडे अहवाल दाखल केला होता , 29 जानेवारी 2019 रोजी शिक्षणाधिकारी परभणी यांनी पाथरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सदरची शाळा अनधिकृत असल्यामुळे या शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकरण करण्यात आले होते सदर शाळेतील 164 विध्यार्थ्यांना जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत समायोजित करण्याच्या लेखी सूचना शिक्षण विभागाने देऊन ही प्रवेशित केले नाही, त्या मुळे सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले , त्याच बरोबर शाळा स्थलांतरित मान्यता नसताना ही टी सी निर्गमित केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

वकिलांकडून विविध कायद्यांबाबत सामान्य जनतेसासाठी मोफत मार्गदर्शनपर लेख जाहीर, या लिंकवर क्लिक करा अथवा 
त्या नंतर 4 जून 2019 रोजी शिक्षण विभागाने सदर शाळा बंद करून शाळेतील 164 विद्यार्थी जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत वर्ग करण्या बाबत ससंस्थेला पत्र दिले , मात्र संस्थेकडून कारवाई झाली नाही, त्या मुळे 15 जून रोजी गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात अनधिकृत शाळा चालवणे आणि अनधिकृत स्थलांतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे, आणि विध्यार्थी व पालक यांची दिशाभूल केल्याची तक्रार दिल्यावरून डॉ शेख सलीम शेख अमीन यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यामध्येकलम 468, 471, 420 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक आवेज काझी हे तपास करत आहेत.

बुधवार, १२ जून, २०१९

प्रज्ञावंत विचारमंचच्या वतिने गुणगौरव सोहळ्याचे सोमठाणा येथे आयोजन

*प्रज्ञावंत विचारमंचच्या वतिने गुणगौरव सोहळ्याचे सोमठाणा येथे आयोजन*

प्रतिनिधी:-प्रज्ञावंत विचारमंच सोमठाणाच्या वतिने १६ तारखेला  दहावी व बारावी मध्ये उतिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.

        प्रज्ञावंत विचारमंचच्या वतिने मागिल आठ वर्षापासुन राजर्षी छत्रपती शाहुमहाराज यांच्या जंयती औचित्य साधुन दहावी व बारावीच्या परीक्षेत उतिर्न झालेल्या विद्यार्थ्यांंचा गुणगौरव करण्यात येतो त्याचाच भाग म्हणून दीनांक १६ तारखेला ९गुणगौरव सोहळ्याचे आयोजन ठीक सांकाळी सहा वाजता करण्यात आले आहे या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.त्याच बरोबर मराठी आणी उर्दू माध्यमातून प्रथम/द्वतिय आलेल्या विद्यार्थ्यांना  विषेश पारितोषिक व सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहीती आयोजकांनी दीली.त्याच बरोबर या सोहळ्यास आवर्जुन उपस्थित राहण्याचे अव्हाहन प्रज्ञावंत विचारमंचच्या वतिने करण्यात आले आहे

पूर्णा पोलिसांची गुटखामाफियांवर जबरदस्त कारवाई ; साडेबारा लाखांचा गुटखा जप्त

पूर्णा पोलिसांची गुटखामाफियांवर जबरदस्त कारवाई ; साडेबारा लाखांचा गुटखा जप्त

    परभणी - जिल्ह्यात बोकाळलेला गुटखा माफियांना नियंत्रित करण्यात अन्न व औषधी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यातच पोलिसांनी आता गुटखामाफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आज मंगळवारी पूर्ण पोलिसांनी एका वाहनाचा पाठलाग करून पाच लाख रुपयांचा गुटखा पकडला. तर दुसऱ्या कारवाईत एका गोदामावर छापा टाकून साडेसात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. आजच्या एकूण कारवाईत पोलिसांनी साडेबारा लाख रुपयांचा गुटखा आणि एक वाहन जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पूर्णा तालुक्यातील ताडकळस रोडवरील कानडखेडा फाट्याजवळ करण्यात आली. 

    दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवारी सकाळी एका चारचाकी वाहनात पालम येथून लाखों रुपयांच्या गुटखा पूर्णा शहरात येणार आहे. या खबरीवरुन जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशाने फौजदार चंद्रकांत पवार, जमादार थरार खान सिद्धीकी, विष्णू भिसे, लतीफ पठाण, समिर पठाण या पथकाने ताडकळस-पूर्णा रोडवरील कानडखेड फाट्याजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गुटखा भरुन आलेल्या चारचाकी वाहनाचा (क्र.एम.एच.२२-ए-११६८) पाठलाग करुन त्यास पकडले. या वाहनाची झडती घेतली असता, त्यात १६ मोठे पोते भरून गोवा आणि राजनिवास गुटखा मिळाला. ज्याचे बाजारमुल्य ५ लाख रुपये आहे. या वाहनाचा चालक अंकूश नागोराव सूर्यवंशी (रा.देगांव पूर्णा व गुटखा मालक माणिक कदम रा. पूर्णा) या दोघांनाही ताब्यात घेऊन पूर्णा पोलीस ठाण्यात हजार करण्यात आले. या गुटखा तस्करी संदर्भात अधीक कसून चौकशी केली असता, हा गुटखा जिल्ह्यातील पालम येथील मुंजा रोकडे यांच्याकडून आणला असल्याचे उघडकीस आले. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना कळवली. त्यानंतर त्यानंतर तात्काळ फौजदार चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकाने वेळ न दवडता पालम येथे जाऊन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंजा रोकडे यांच्या गोडाऊन वर छापा मारला. त्या गोडाऊन मध्ये सुमारे ७ लाख लाख रुपयांचा गोवा व राजनिवास गुटख्याचे मोठे ३० पोते मिळून आले. त्यामुळे मुंजा रोकडे यास ताब्यात घेऊन पूर्णा पोलिसांनी ७ लाख रुपये किमतीचा हा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ३ जणांना पूर्णा पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार पुढील तपास करत आहेत.

परभणी जिल्ह्यात १०१संशयित बोगस डाँक्टर,तिन वर्षांत ९४ बोगस डाँक्टरांवर करण्यात आली कारवाई,जिल्ह्यातील ग्रामिन रुग्णालयाती वैद्यकीय अधिकार्यांनी थाटले दवाखाने,मेडीकल व्यवसायात तर मोठी अफरा-तफरी परवाना एकाचा तर मेडीकल दुसर्याची

*परभणी जिल्ह्यात १०१संशयित बोगस डाँक्टर*


*तिन वर्षांत ९४ बोगस डाँक्टरांवर करण्यात आली कारवाई*


*जिल्ह्यातील ग्रामिन रुग्णालयाती वैद्यकीय अधिकार्यांनी थाटले दवाखाने*


*मेडीकल व्यवसायात तर मोठी अफरा-तफरी परवाना एकाचा तर मेडीकल दुसर्याची*

परभणी/प्रतिनिधी:- कोणताही वैद्यकीय परवाना नसनारे व केवळ पैशाच्या अमिषापोटी ग्रामिन भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळणार्या तथाकथित बोगस डाँक्टरांवर जिल्हा प्रशासनाने बडगा उचलल्याचे आपल्याला मागील काही दीवसात पहावयास मिळाले आहे.

   परभणी जिल्ह्यात मागील तीन वर्षात ग्रामिन भागात १०१संशयित बोगस डाँक्टर आढळुन आले त्यापैकी ९४ बोगस डा्क्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत .यापुढेही ही कारवाई गतिमान करणार असल्याचे संकेत माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ.बि.एम.शिंदे यांनी दीले आहेत.विषेश म्हणजे जिंतुर तालुक्यात सर्वाधिक ५३ तर मानवत तालुक्यात १६परभणी तालुक्यात ११,पुर्णा ४,पालम ३,सोनपेठ ३,सेलु ६,गंगाखेड ७ असे एकुण १०१ बोगस डॉक्टर आढळुन आले आहेत.

जिल्ह्यात सन२०१७-१८ मध्ये शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार धडक मोहीम राबवली होती त्यामध्ये जिल्ह्यातील १२४ खाजगी दवाखाण्याची तपासणी करण्यात आली असता त्यामध्ये ८संशयित बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळून आले होते त्यापैकी ४ बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात आली तर उर्वरित ४ जणांनी आपले दवाखाने बंद करुन पोबारा केला.

यापुढे असे वैद्यकीय व्यसायिक आढळून आल्यास महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३(१)व (2)अन्ववे संशयास्पद वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बि.एम शिंदे यांनी सांगितले आहे.


*ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यानी थाटले दवाखाने,आरोग्य विभाग मात्र झोपेत*

तालुक्यातील सर्व ग्रामिन रूग्णालयात रूग्णांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात गरजेनुसार वैद्यकीय अधिकार्याच्या नियुक्त्या करण्यात येतात परंतु असे काही महाशय ग्रामीण रुग्णालयात सेवेकरीता रुजु असताना देखील त्यांनी आपला खाजगी वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी दवाखाने थाटले आहेत याकडे मात्र स्थानिक प्रशासन व आरोग्य प्रशासन दुर्लक्ष करताना दीसत आहे .

*मेडीकल परवाना एकाचा तर चालवनारा दुसराच*

अनेक वीद्यार्थी बि.फार्मशी करून मेडीकल परवाना घेवुन ते परवाने दुसर्याला भाडेत्वावर देवुन थोडफार शिकलेला व्यक्ती मेडीकल थाटतो आणी आपला व्यवसाय थाटुन रूग्णाच्या जिवाशी खेळ चालु असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे.

मंगळवार, ११ जून, २०१९

ते आले...त्यांनी पाहिलं....सुचनाकेल्या...आणि लागलीच पाचलक्ष रुपयांची मदत केली.जन्मभुमी फाऊंडेशन च्या वतिने वाघाळा येथे चालु असलेल्या बंधार्यास आ.मोहन फड यांची भेट,पाच लाख रुपयाचा दीला मदत नीधी

ते आले...त्यांनी पाहिलं....सुचनाकेल्या...आणि लागलीच पाचलक्ष रुपयांची मदत केली.


प्रतिनिधी/पाथरी:-साधारण दुपारी दोन अडीचची वेळ..उष्णतेची लाट साहेब येणार म्हणून जन्मभूमी फाऊंडेशन सदस्य तळपत्या उन्हात वाटे कडे नजरा लाऊन बसलेले एवढ्यात दुरवर गाडी दिसली आणि आपण जनते साठी करत असलेले काम पहाण्या साठी खुद तालुक्याचे प्रथम नागरीक येत असल्याचे समाधान सर्वांच्या चेह-यावर  दिसले.साहेब आले ते थेट बंधा-यात  उतरले मध्ये दुरवर फेर फटका मारला.कामाचं तोंड भरून कौतूक केलं.फाऊंडेशन पदाधिकारी यांना सुचना केल्या.आणि लागलीच अशा कामां साठी तब्बल पाच लक्ष रुपयांचा निधी दिला.

पाथरी विधानसभा मतदार संघाचे आ मोहनराव फड यांची सामाजिक कार्याला नेहमीच मदत राहिली आहे.मदतीचा हात मागणाराला रिकाम्या हाती परत जाऊ द्यायचं नाही ही भाऊंची खासियत पाथरी तालुक्यातील वाघाळा गावात जन्मभूमी फाऊंडेशन संवेदनशील माणसांच्या मदतीने अर्धा किमी अंतराचा बंधारा बांधत असल्याची माहिती भाऊंना देण्यात आली होती.या ठिकाणी नक्की पाहाणी करण्या साठी येईल असा शब्द त्यांनी दिला होता ठरल्या प्रमाणे त्यांनी वेळ दिला आणि लिंबा येथील कार्यक्रम आटोपून एका आत्महात्या केलेल्या कुटूंबाला भेट देऊन ते वाघाळा-फुलारवाडी  सिमेवर दाखल झाले.या वेळी त्यांच्या सोबत मानवत पं स सदस्य दत्तराव जाधव आणि कार्यकर्ते होते.काठवरून पहाणी न करता थेट जेथे काम सुरू आहे त्यात उतरले.दुरवर पहाणी करत फिरले फाऊंडेशनच्या सदस्यांना सुचना केल्या,कामाचं कैतूक करत शेतक-यांनी  गावागावात पुढे यावे आणि अशी कामे करावी असे आवाहन केले.या बंधा-या  मुळे या भागाचा हा शेवटचा दुष्काळ असले असे सांगीतले.आणि लागलीच बंधारा कामां साठी पाचलक्ष रुपयांचा निधी जन्मभूमी फाऊंडेशनला दिला.या वेळी जवळच मळ्यात फाऊंडेशनच्या वतीन आ मोहनराव फड यांच्या स्वागताचा कार्यक्रम संपन्न झाला.या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी सदाशिव थोरात यांनी आ फड यांचा सत्कार केला.यावेळी सचिव किरण घुंबरे पाटील सदस्य गोपाल लाड, पत्रकार किशन बाराहाते,ग्रामविकास अधिकारी संदिपान घुंबरे,आरोग्यसेवक पप्पू नखाते, बाभळगावचे सरपंच कांबळे,माधव घुंबरे,ग्रामस्थ सुशिल घुंबरे,सुनिल घुंबरे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी जन्मभूमी फाऊंडेशनच्या वतीने आ फड यांचे आभार मानले

प्रा.गंगाधर भोसले यांना पीएच.डी.

प्रा.गंगाधर भोसले यांना पीएच.डी.


वसमत : (प्रतिनिधि)

 तालुक्यातील आंबा येथील प्रा. गंगाधर रामकृष्ण भोसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. पदवी  प्रदान केली.

  भोसले यांनी प्रा. डॉ. कल्पना एच. घारगे यांच्या मार्गदर्शनात अंतर्गत  “ महाराष्ट्र शासनाचे ग्रामस्वच्छता विषयक धोरण - विशेष संदर्भ - हिंगोली जिल्हा ” या विषयावर औरंगाबाद च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. त्यांची मौखिकी बहि:स्थ परीक्षक  मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. मृदुल निळे यांच्यासमक्ष घेतल्यानंतर त्यांना विद्यापीठाने पीएच.डी. ही पदवी प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, डॉ. किशन बाभुळगावकर, राजेश मंचेवार, डॉ.कामाजी डक, डॉ. बाळासाहेब भिंगोले,प्रा .रा.ना.गरूड आदींनी सत्कार केला

फूल विकुन तहानलेल्या प्रवाश्याना पाजले मोफत ठंडगार पाणी,वसमतच्या फूल विक्रेत्याने जपली चार महिन्या पासुन सामाजिक बांधीलकी

*फूल विकुन तहानलेल्या  प्रवाश्याना पाजले मोफत ठंडगार पाणी*


*वसमतच्या फूल विक्रेत्याने जपली चार महिन्या पासुन सामाजिक बांधीलकी*


वसमत (प्रतिनिधि)

परभणी महामार्गावरी वरील झिरो फाठा येथे वसमत येथील फुलविक्रेता अब्दुल सरदार अब्दुल सत्तार याने सामाजिक जपत कडक उन्हात सतत चार महिने स्वखर्चाने प्रवाश्याना थंडगार पाणी (मिनरल्स वाटर) मोफत पाजले या अभिनव उपक्रमाची दखल घेत परिसरातील गावकरी मंडळीनी अब्दुल सरदार यांचा शाल व पुष्प गुच्छ देवुन सत्कार केला


अधिक माहिती अर्शी की वसमत येथील 

अब्दुल सरदार हे झिरो फाटा येथे गाड्यावर फुल विकुन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवतात परभणी,वसमत,जवळा बाजार व पूर्णा येथील प्रवाश्यासाठी झिरो फाटा हे केंद्र बिंदू असल्याने दिवसभरातून असख़्य प्रवाशी येथे येतात आलेल्या प्रवाश्याना शुद्ध व ठंड पाणी पिण्यासाठी 15 ते 20 रुपयांची बॉटल विकत घ्यावी लागते तर गरीब प्रवाश्याना मात्र हे शक्य नसल्याचे पाहुन अब्दुल सरदार यांनी आपल्या फूल विक्रीतुन मिळणा-या  रकमेतुन दररोज 15 ते 20 

 (मिनरल्स वाटर) थंडपाण्याचे डब्बे स्वखर्चातुन विकत आणुन प्रवाश्याना मोफत सुविधा पुरवतात एवढेच नव्हे तर प्रवाशी बाटल्या भरून पाणी सोबत नेतात मागील चार महिन्या पासुन अविरत पने अब्दुल सरदारने ही सेवा पुरवत अनेकांची ताहन भागवत सामाजिक बांधीलकी जपली आहे


 त्यांच्या या अभिनव उपक्रमाची दखल घेत परिसरातील गावकरी मंडळीनी सोमवारी दुपारी अब्दुल सरदार यांचा शाल व पुष्प गुच्छ देवुन सत्कार केला आहे या प्रसंगी माणिकराव काळे (पंचायत समिती सदस्य ),विश्वांबर दासराव पांडे (ग्रा़.पं.कर्मचारी,कात्नेश्वर),शिवाजीराव माणिकराव चापके,किरण रामराव सरपे,विष्णू प्रभुगिरी,शेख सरू शेख बाले साहब, मिर्झा अमजद बेग,शेख शाहेद बसमत आदिनी त्यांचा सत्कार करुन कौतुकाची थाप दिली

सपोनि शंकर वाघमोडे यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या,वाळू,तीन टिप्पर सह 15 लाख 75 हजराचा मुद्देमाल जप्त,सहा जणांवर कारवाई

*सपोनि शंकर वाघमोडे यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या* 


*वाळू,तीन टिप्पर सह 15 लाख 75 हजराचा मुद्देमाल जप्त,सहा जणांवर कारवाई*


वसमत (     )

हट्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून सपोनि शंकर वाघमोडे यांनी पदभार स्वीकारताच क्षेत्रातील वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून दिनांक 9 व 10 जून रोजी तीन टिप्पर,वाळूसह 15 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा जनावर कारवाई केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे


पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हट्टा पोलीस स्थानकात हद्दीत काही वाळू माफिया चोरी-छुपे मार्गाने वाळू तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांनी आपल्या पथकासह छापा मारला असता टिप्पर चे चालक,मालक यांनी संगनमत करून शासनाची रॉयल्टीची पावती न घेता आजरसोंडा नदीपात्रातून टिप्पर मध्ये वाळू भरून शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरी वाहतूक करीत असताना तीन टिप्पर मिळून आले


दिनांक 9 जून रोजी रात्री 9:15 वाजता

टिप्पर क्रमांक एम.एच 27 X 0331 मध्ये आजरसोंडा नदी पात्रातुंन अडीच ब्रास वाळूची चोरी वाहतूक करताना टिप्पर मिळून आला या प्रकरणी पोलिस कर्मचारी राजाराम किशनराव कदम यांच्या फिर्यादीवरून चालक शेख नबी शेख हबीब, मालक अक्षय देशमुख, परभणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर व अडीच ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

-------------------------

दिनांक 9 जून रोजी रात्री 9:55 वाजता

टिप्पर क्रमांक एम.एच 20 LT-5657 मध्ये आजरसोंडा नदी पात्रातुंन अडीच ब्रास वाळूची चोरी वाहतूक करताना टिप्पर मिळून आला  या प्रकरणी पोलिस कर्मचारी ज्ञानोबा त्र्यबक मुलगिर यांच्या फिर्यादीवरून चालक ज्ञानेश्वर नारायण बोबडे मालक चंद्रकांत देशमुख,भोगांव ता.जिंतुर जि.परभणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर व अडीच ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

------------------------

दिनांक 10 जून रोजी रात्री 12:15 वाजता

टिप्पर क्रमांक एम.एच 10 Z-3155 मध्ये आजरसोंडा नदी पात्रातुंन अडीच ब्रास वाळूची चोरी वाहतूक करताना टिप्पर मिळून आला या प्रकरणी सपोनि शंकर वाघमोड़े यांच्या फिर्यादीवरून चालक हनुमान पंडितराव चव्हाण मालक नाव माहित नाही यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर व अडीच ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे


एकूण तीन टिप्पर वर कार्यवाही करून 15 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा जनावर कारवाई करण्यात आल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे

अकोली येथे कर्जास कंटाळुन तरुण शेतकर्यांची अात्महत्या

अकोली येथे कर्जास कंटाळुन तरुण  शेतकर्यांची अात्महत्या


जिंतूर प्रतिनिधी 

    तालुक्या पासुन जवळच असलेल्या अकोली येथे कर्जबारी पणास कंटाळुन गजानन बबनराव रोकडे वय ३० वर्ष यांनि अापल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन  अात्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी १२ वाजता घडली.

    अकोली परीरसात मागील अनेक दिवसांपासुन दुष्काळाची परीस्थिती निर्माण झाली अाहे. जनावरांच्या खाद्यासह पाण्याची परीस्थितीही बिकट झाली अाहे. सततची नापीकी व महिन्द्रा फायनन्सचे दिड लाख व मध्यवर्ती बॅंकेचे पन्नास हजार रुपयाचे कर्ज परत करता येत नसल्यामुळे गजानन रोकडे यांनि राहत्या घरी अात्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले बायको व अाई असा परीवार अाहे. त्यांच्या या दुखद निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात अाहे.

जिंतूर-सेलूतील खंडित वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करा,ऊर्जा मंत्री ना.बावनकुळे यांनी दिले परभणी महावितरणला आदेश,भाजपा युवा नेते मा.राजेशभैय्या घुगे(रेपेकर) यांनी केला होता पाठपुरावा

*जिंतूर-सेलूतील खंडित वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करा-*

*ऊर्जा मंत्री ना.बावनकुळे यांनी दिले परभणी महावितरणला आदेश*

  *भाजपा युवा नेते मा.राजेशभैय्या घुगे(रेपेकर) यांनी केला होता पाठपुरावा* 

जिंतूर/  निशाद आहेमद 

    जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी *भाजयुमो प्रदेश चिटणीस राजेश घुगे(रेपेकर)* यांनी *राज्याचे ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे* यांची भेट घेऊन निवेदन दिल्याने खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाय योजना कराव्या अशे आदेश ऊर्जा मंत्र्यांनी महावितरणला दिले आहे.

          जिंतूर व सेलू शहरासह तालुक्यातील वादळी पाऊस व वाऱ्यामुळे विद्युत तारा व पोल तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील गावांमध्ये गेल्या 5 ते 7 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंबीर झाला आहे. परभणी महावितरण कंपनी सदरील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाळाटाळ करून विलंब लावत असल्याने सदरील प्रकरणाची तक्रार भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेश घुगे(रेपेकर) यांनी मुबंई मंत्रालय येथे राज्याचे ऊर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनाची दखल घेऊन मंत्री महोदयांनी जिंतूर-सेलू शहरासह तालुक्यातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यासाठीच्या उपाययोजना युद्ध पातळीवर राबविण्याच्या सूचना दिल्या व परत मंत्री कार्यालयाला केलेल्या उपायोजनेचा तपशील देण्यास सांगितले,उद्या पासून सदरील कामास सर्वत्र सुरुवात होईल असे मंत्री महोदयांना परभणी महावितरण कार्यलयातून सांगण्यात आले आहे.

केळीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी

केळीच्या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी

पाथरी -प्रतिनिधी

पाणी कमी पडल्यामुळे व ४जुन रोजी वादळी वाऱ्यामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी पोहेटाकळी येथील शेतकरी दत्ता सुंदरराव गोंगे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी याच्याकडे केली आहे. 

  दत्ता गोंगे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोहेटाकळी शिवारात गट न.११८ मध्ये मला १ हेक्टर २८ आर जमीन असुन मी जुन २०१८ मध्ये जमीनीची मशागत करून टिश्युकल्चर जातीच्या केळीची लागवड केली होती. याची खत घालुन मशागत केल्यामुळे केळीचा जोमदार फड आला होता.पण गेल्या विस दिवसापासून पाणी कमी पडत असल्यामुळे केळीचे नुकसान होत होते.त्यातच ४ जुन रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात केळीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रति सर्व संबधिताना देण्यात आल्या आहेत.

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...