अकोली येथे कर्जास कंटाळुन तरुण शेतकर्यांची अात्महत्या
जिंतूर प्रतिनिधी
तालुक्या पासुन जवळच असलेल्या अकोली येथे कर्जबारी पणास कंटाळुन गजानन बबनराव रोकडे वय ३० वर्ष यांनि अापल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन अात्महत्या केल्याची घटना सोमवार रोजी १२ वाजता घडली.
अकोली परीरसात मागील अनेक दिवसांपासुन दुष्काळाची परीस्थिती निर्माण झाली अाहे. जनावरांच्या खाद्यासह पाण्याची परीस्थितीही बिकट झाली अाहे. सततची नापीकी व महिन्द्रा फायनन्सचे दिड लाख व मध्यवर्ती बॅंकेचे पन्नास हजार रुपयाचे कर्ज परत करता येत नसल्यामुळे गजानन रोकडे यांनि राहत्या घरी अात्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले बायको व अाई असा परीवार अाहे. त्यांच्या या दुखद निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात अाहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा