बुधवार, १२ जून, २०१९

पूर्णा पोलिसांची गुटखामाफियांवर जबरदस्त कारवाई ; साडेबारा लाखांचा गुटखा जप्त

पूर्णा पोलिसांची गुटखामाफियांवर जबरदस्त कारवाई ; साडेबारा लाखांचा गुटखा जप्त

    परभणी - जिल्ह्यात बोकाळलेला गुटखा माफियांना नियंत्रित करण्यात अन्न व औषधी प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. त्यातच पोलिसांनी आता गुटखामाफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आज मंगळवारी पूर्ण पोलिसांनी एका वाहनाचा पाठलाग करून पाच लाख रुपयांचा गुटखा पकडला. तर दुसऱ्या कारवाईत एका गोदामावर छापा टाकून साडेसात लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. आजच्या एकूण कारवाईत पोलिसांनी साडेबारा लाख रुपयांचा गुटखा आणि एक वाहन जप्त करून तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई पूर्णा तालुक्यातील ताडकळस रोडवरील कानडखेडा फाट्याजवळ करण्यात आली. 

    दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आज मंगळवारी सकाळी एका चारचाकी वाहनात पालम येथून लाखों रुपयांच्या गुटखा पूर्णा शहरात येणार आहे. या खबरीवरुन जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या आदेशाने फौजदार चंद्रकांत पवार, जमादार थरार खान सिद्धीकी, विष्णू भिसे, लतीफ पठाण, समिर पठाण या पथकाने ताडकळस-पूर्णा रोडवरील कानडखेड फाट्याजवळ सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गुटखा भरुन आलेल्या चारचाकी वाहनाचा (क्र.एम.एच.२२-ए-११६८) पाठलाग करुन त्यास पकडले. या वाहनाची झडती घेतली असता, त्यात १६ मोठे पोते भरून गोवा आणि राजनिवास गुटखा मिळाला. ज्याचे बाजारमुल्य ५ लाख रुपये आहे. या वाहनाचा चालक अंकूश नागोराव सूर्यवंशी (रा.देगांव पूर्णा व गुटखा मालक माणिक कदम रा. पूर्णा) या दोघांनाही ताब्यात घेऊन पूर्णा पोलीस ठाण्यात हजार करण्यात आले. या गुटखा तस्करी संदर्भात अधीक कसून चौकशी केली असता, हा गुटखा जिल्ह्यातील पालम येथील मुंजा रोकडे यांच्याकडून आणला असल्याचे उघडकीस आले. ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना कळवली. त्यानंतर त्यानंतर तात्काळ फौजदार चंद्रकांत पवार व त्यांच्या पथकाने वेळ न दवडता पालम येथे जाऊन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंजा रोकडे यांच्या गोडाऊन वर छापा मारला. त्या गोडाऊन मध्ये सुमारे ७ लाख लाख रुपयांचा गोवा व राजनिवास गुटख्याचे मोठे ३० पोते मिळून आले. त्यामुळे मुंजा रोकडे यास ताब्यात घेऊन पूर्णा पोलिसांनी ७ लाख रुपये किमतीचा हा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ३ जणांना पूर्णा पोलिसांनी अटक केली असून पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चंद्रकांत पवार पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...