रविवार, २३ जून, २०१९

जिंतूरच्या सायकल सवारांनी मंठ्यात दिला एकतेचा संदेश, मंठा पोलीस दलातर्फे सायकल सवारांनाचा गौरव ,70 कि.मी. लांब पाल्याचा प्रवास सायकलने केला पूर्ण

जिंतूरच्या सायकल सवारांनी मंठ्यात दिला एकतेचा संदेश

* मंठा पोलीस दलातर्फे सायकल सवारांनाचा गौरव

* 70 कि.मी. लांब पाल्याचा प्रवास सायकलने केला पूर्ण

जिंतूर  / निशाद आहेमद 

      जिंतूर  येलदरी सायकल स्वार समूहातील विविध जाती धर्माच्या दहा सायकल पट्टूनी एकत्रितपणे सामाजिक, धार्मिक सद्भावना निर्माण करण्यासाठी जिंतूर-मंठा-जिंतूर असा तब्बल 70 कि.मी. चा प्रवास सायकलने पूर्ण करून सामाजिक, धार्मिक सद्भावना एकता रॅलीत सक्रिय सहभाग नोंदवून एकतेचा संदेश दिला. यावेळी मंठा पोलीस दलातर्फे सायकल समूहातील सदस्यांचा गौरव करण्यात आला. 

           जिंतूर शहर व परिसरात वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुदृढ शरीर संपत्ती निर्मिती करण्याकरिता तसेच नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी जिंतूर शहर व येलदरी येथील सायकल पट्टू मागील दोन वर्षापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांमध्ये सायकल चालविण्याची गोडी निर्माण व्हावी याकरिता जिंतूर येथे भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करून जनजागृती केली. आणि रविवारच्या सुट्टीचा सदुपयोग म्हणून सायकल समूहातील दहा सदस्यांनी जिंतूर-मंठा-जिंतूर असा तब्बल 70 किमीचा प्रवास सायकलवर करून मंठा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात सामाजिक, धार्मिक सद्भावना एकता रॅलीत सायकल पट्टूनी सक्रिय सहभाग नोंदवून एकतेचा संदेश दिला. यावेळी मंठा येथील नागरिक तसेच पोलीस निरीक्षक विलास निकम यांनी सायकल स्वारांचा गौरव केला. सायकल समूहाच्या या अभिनव उपक्रमात प्रमोद भालेराव,  व्यंकटेश भुरे, शिवा साखरकर, शेख अलीम, शाम चव्हाण, महेश डासाळकर, यासीन खान,  प्रेम मेनकुदळे  शहेजाद खान,  या सायकल सवारांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...