तरुणाला भर रस्त्यात पेटऊन दिल्या प्रकरणी पाच आरोपी ताब्यात .
दोन दिवसात आरोपी पकडले
सेलू पोलिसांची कामगिरी
परभणी प्रतिनिधी/लक्ष्मण उजगरे
जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथिल युवक सतीश बरसाले यास जिवंत जाळल्याची घटना शनिवार दि 15 जुन रोजी घडली होती. परिसरात या खुनाने खळबळ माजली होती .या प्रकरणी गुप्त माहिती अधारे सेलू पोलीसांनी पाच आरोपीना तालुक्यातील देवगाव फाटा येथून घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी अटक केली आहे.
शनिवारी सतीश वालुर हुन सेलूकडे जात असताना आरोपींनी रस्त्यामध्ये अडून पेटवून दिले होते .याप्रकरणी आरोपी विरोधात सेलू पोलीस ठाण्यात कलम 302,143,147,148 नुसार गुन्हा दाखल झाला होता .
दरम्यान पोलिसांना प्रकरणातील आरोपी उध्दव खोक्षे , जिवन खोक्षे, दिगांबर खोक्षे, दत्ता खोक्षे सर्वजण रा .ब्राम्हणगाव ता.सेलू यांना देवगाव फाटा येथून ताब्यात घेतले आहे .
सदरील कार्यवाही पोलीस अधिक्षक कृष्णकांत अपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एकबोटे यांच्या नेतृत्वात पोलीस निरिक्षक शेळके, सहपोलीस निरिक्षक रामोड, सहपोलीस उपनिरिक्षक लोकुलवार, अप्पा वराडे यांनी केली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा