विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ:पाथरीतील इंटरनॅशनल बोगस शाळेचा पर्दाफाश
लक्ष्मण उजगरे/पाथरी :– पाथरी येथील आनंदवन इंटरनॅशनल स्कूल या शाळेला शासनाची मान्यता नसताना ही गेल्या दोन वर्षापासून बनावट दस्तऐवजच्या आधारे बोगस शाळा चालवून पालकांची दिशाभूल करत विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश देऊन फसवणूक केल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी अधिकारी विश्वास खोगरे यांच्या फिर्यादीवरून संस्था चालकांवर गुन्हा दाखल झाला आहे शाळेत प्रवेश घेतलेल्या 164 विद्यार्थीचे भवितव्य अंधारात आले आहे.
पाथरी येथील डॉक्टर सलीम मेडिकल एज्युकेशन फाउंडेशन संचलित आनंदवन इंटरनॅशनल स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे, सध्या या शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू आहेत , या शाळेला शासनाची मान्यता नसल्याची तक्रार पाथरी येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल साळवे यांनी शिक्षण विभागाकडे केली होती या प्रकरणी गट शिक्षणाधिकारी पाथरी यांनी या शाळेच्या मान्यतेबाबत चौकशी करून वरिष्ठाकडे अहवाल दाखल केला होता , 29 जानेवारी 2019 रोजी शिक्षणाधिकारी परभणी यांनी पाथरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सदरची शाळा अनधिकृत असल्यामुळे या शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्राधिकरण करण्यात आले होते सदर शाळेतील 164 विध्यार्थ्यांना जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत समायोजित करण्याच्या लेखी सूचना शिक्षण विभागाने देऊन ही प्रवेशित केले नाही, त्या मुळे सर्व विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले , त्याच बरोबर शाळा स्थलांतरित मान्यता नसताना ही टी सी निर्गमित केल्याचे चौकशीत आढळून आले आहे.
वकिलांकडून विविध कायद्यांबाबत सामान्य जनतेसासाठी मोफत मार्गदर्शनपर लेख जाहीर, या लिंकवर क्लिक करा अथवा
त्या नंतर 4 जून 2019 रोजी शिक्षण विभागाने सदर शाळा बंद करून शाळेतील 164 विद्यार्थी जवळच्या मान्यता प्राप्त शाळेत वर्ग करण्या बाबत ससंस्थेला पत्र दिले , मात्र संस्थेकडून कारवाई झाली नाही, त्या मुळे 15 जून रोजी गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांनी पाथरी पोलीस ठाण्यात अनधिकृत शाळा चालवणे आणि अनधिकृत स्थलांतर प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे, आणि विध्यार्थी व पालक यांची दिशाभूल केल्याची तक्रार दिल्यावरून डॉ शेख सलीम शेख अमीन यांच्यावर पाथरी पोलिस ठाण्यामध्येकलम 468, 471, 420 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरीक्षक आवेज काझी हे तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा