प्रा.गंगाधर भोसले यांना पीएच.डी.
वसमत : (प्रतिनिधि)
तालुक्यातील आंबा येथील प्रा. गंगाधर रामकृष्ण भोसले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली.
भोसले यांनी प्रा. डॉ. कल्पना एच. घारगे यांच्या मार्गदर्शनात अंतर्गत “ महाराष्ट्र शासनाचे ग्रामस्वच्छता विषयक धोरण - विशेष संदर्भ - हिंगोली जिल्हा ” या विषयावर औरंगाबाद च्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. त्यांची मौखिकी बहि:स्थ परीक्षक मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. मृदुल निळे यांच्यासमक्ष घेतल्यानंतर त्यांना विद्यापीठाने पीएच.डी. ही पदवी प्रदान केली आहे. याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील, डॉ. किशन बाभुळगावकर, राजेश मंचेवार, डॉ.कामाजी डक, डॉ. बाळासाहेब भिंगोले,प्रा .रा.ना.गरूड आदींनी सत्कार केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा