*सपोनि शंकर वाघमोडे यांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या*
*वाळू,तीन टिप्पर सह 15 लाख 75 हजराचा मुद्देमाल जप्त,सहा जणांवर कारवाई*
वसमत ( )
हट्टा पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून सपोनि शंकर वाघमोडे यांनी पदभार स्वीकारताच क्षेत्रातील वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून दिनांक 9 व 10 जून रोजी तीन टिप्पर,वाळूसह 15 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा जनावर कारवाई केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की हट्टा पोलीस स्थानकात हद्दीत काही वाळू माफिया चोरी-छुपे मार्गाने वाळू तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर श्रीराम वाघमोडे यांनी आपल्या पथकासह छापा मारला असता टिप्पर चे चालक,मालक यांनी संगनमत करून शासनाची रॉयल्टीची पावती न घेता आजरसोंडा नदीपात्रातून टिप्पर मध्ये वाळू भरून शासनाचा महसूल बुडवून वाळूची चोरी वाहतूक करीत असताना तीन टिप्पर मिळून आले
दिनांक 9 जून रोजी रात्री 9:15 वाजता
टिप्पर क्रमांक एम.एच 27 X 0331 मध्ये आजरसोंडा नदी पात्रातुंन अडीच ब्रास वाळूची चोरी वाहतूक करताना टिप्पर मिळून आला या प्रकरणी पोलिस कर्मचारी राजाराम किशनराव कदम यांच्या फिर्यादीवरून चालक शेख नबी शेख हबीब, मालक अक्षय देशमुख, परभणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर व अडीच ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
-------------------------
दिनांक 9 जून रोजी रात्री 9:55 वाजता
टिप्पर क्रमांक एम.एच 20 LT-5657 मध्ये आजरसोंडा नदी पात्रातुंन अडीच ब्रास वाळूची चोरी वाहतूक करताना टिप्पर मिळून आला या प्रकरणी पोलिस कर्मचारी ज्ञानोबा त्र्यबक मुलगिर यांच्या फिर्यादीवरून चालक ज्ञानेश्वर नारायण बोबडे मालक चंद्रकांत देशमुख,भोगांव ता.जिंतुर जि.परभणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर व अडीच ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
------------------------
दिनांक 10 जून रोजी रात्री 12:15 वाजता
टिप्पर क्रमांक एम.एच 10 Z-3155 मध्ये आजरसोंडा नदी पात्रातुंन अडीच ब्रास वाळूची चोरी वाहतूक करताना टिप्पर मिळून आला या प्रकरणी सपोनि शंकर वाघमोड़े यांच्या फिर्यादीवरून चालक हनुमान पंडितराव चव्हाण मालक नाव माहित नाही यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर व अडीच ब्रास वाळू असा एकूण 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
एकूण तीन टिप्पर वर कार्यवाही करून 15 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सहा जनावर कारवाई करण्यात आल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा