सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

नाविन्यपूर्ण पशुसंवर्धनाच्या योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

नाविन्यपूर्ण पशुसंवर्धनाच्या योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन

परभणी, दि.10 – नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनांसाठी सन 2018-19 परभणी जिल्हयाकरिता विविध योजनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याकरिता पशुसंवर्धन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

1) दुधाळ संकरीत गाई/म्हशींचे गट वाटप करणे, 2) शेळी / मेंढी गट वाटप करणे, 3) मांसल कुक्कुट पक्षी संगोपन करणे या योजनांसाठी सर्वसाधारण/अनुसूचित जाती या प्रवर्गातील 18 वर्षावरील अर्जदारांकडून 15 नोव्हेंबर 2018 ते 29 नोव्हेंबर 2018 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनांची पूर्ण माहिती व अर्ज सादर करण्याची कार्यपध्दती या बाबतचा संपूर्ण तपशिल https://ah.mahabms.com  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारल्या जातील. इच्छुक अर्जदारांनी वरील कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर एसएमएसद्वारे संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत निवड अंतिम होईपर्यंत अर्जदाराने आपला भ्रमणध्वनी क्रमांक बंदलू नये असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...