गोदाकाठ प्रतिष्ठान थडी उक्कडगाव च्यावतीने शाळेस ग्रंथदान
म.ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतीथीचे निमित्त साधुन बाहेरगावी असलेल्या युवकांचा गावच्या शाळेसाठीचा उपक्रम
सोनपेठ(प्रतिनिधी)
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२८व्या पुण्यतीथी निमित्त मौ.थडी उक्कडगाव येथील जि.प.प्रा.शाळेत अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे, मुंबईत आदी ठिकाणी व्यवसायानिमित्त स्थाईक असलेेेेल्या तरुणांनी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २० हजार रुपयांहून अधिक किमतीची पुस्तके शाळेेच्या ग्रंथालयास भेेट दिली. मागील वर्षीही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शाळेसाठी मदत पुरविली होती. याही वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन शाळेच्या ग्रंथालयासाठी २०हजाराहून अधिक रुपयांची थोर नेते, क्रांतिकारक, समाजसेवक, विचारवंत, युगपुरुषांचे चरित्र आदी बहुमोल ग्रंथसंपदा भेट दिली. याचवेळी ग्रंथदालनाचे उद्घाटनही माजी सरपंच श्रीराम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले.
अभिवादनाच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते म.ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व ग्रंथदालनाचे उद्घाटन करून झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच प्रभाकरराव डुकरे, उद्घाटक म्हणुन माजी सरपंच श्रीराम भंडारे यांची उपस्थिती होती; तर गोदाकाठ प्रतिष्ठानचे सदस्य अशोक वासुंबे, अशोकराव चांदवडे, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर, केंद्रप्रमुख प्रताप भंडारे, केंद्रिय मुख्याध्यापक भगवानराव भंडारे, पत्रकार किरण स्वामी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश चांदवडे, आणि आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांंचे शाळेच्या वतीने पुस्तक व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अशोक वासुबे, प्रताप भंडारे, रणजीत भंडारे, राजेश खेडकर, श्रीराम भंडारे, प्रभाकर डुकरे, किरण स्वामी, केंंद्रप्रमुख आरसले आदींंनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेतील सर्व शिक्षक तसेच गोदाकाठ प्रतिष्ठानचे मंचक आप्पा चांदवडे, भगवान भंडारे, सुदाम चांदवडे, अमोल शिंदे, नारायण भंडारे, वैजेनाथ कांबले, आत्माराम रणखांबे, विष्णु भंडारे, राम होसनाले आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक मोरे यांनी केले तर मुख्यध्यापक शशिकांत बिराजदार यांंनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सहशिक्षक मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.
बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१८
गोदाकाठ प्रतिष्ठान थडी उक्कडगाव च्यावतीने शाळेस ग्रंथदान
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा