गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८

स्थलांतरीत पालकांच्या मुलांसाठी अनिवासी हंगामी वस्तिग्रह--चोरमारे सर(केंद्रप्रमुख गुंज खुर्द)

स्थलांतरीत पालकांच्या मुलांसाठी अनिवासी हंगामी वस्तीग्रह.--- चोरमारे सर केंद्रप्रमुख, गुंज खु 


पथरी /प्रतिनिधी--आज दिनांक (29 नोव्हेंबर 2018 ) रोजी अनिवासी हंगामी वसतीग्रहाचे उद्धाटन मा केंद्रप्रमुख चोरमारे सर यांच्या हस्ते झाले, प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल साळवे, बाळासाहेब खोपे, राजू साठे समन्वयक , संकल्प मानव विकास संस्था, तर सरोदे सर, मुख्यध्यापक खेत्री सर, सहशिक्षक सोळंके सर, निर्वाळ सर होते, पुढे बोलताना चोरमारे सर म्हणाले की, हंगामी वसतिगृह हे स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शाळेत सुविधा सुरू केले त्यामध्ये सकाळी नास्ता, सायंकाळी जेवण, रात्रीला मुलांना 2 तास अभ्यास घेणे, ह्या सुविधा असतात, नियमित जेवण देऊन अभ्यास करणे आणि मुलांनी नियमित शाळेत येणे गरजेचे आहे, त्यानंतर  विठ्ठल साळवे यांनी मनोगत व्यक्त करताना संकल्प संस्था मागील 10 वर्षयपासून मुलांचे अधिकार देण्याससाठी काम करीत असून मुलांना अधिकार देण्यासाठी गाव तेथे हंगामी वसतिगृह स्थापन करण्याची भूमिका घेतली आणि त्यासाठी गावात मुलांचा सर्वे करणे, शिक्षणाधिकारी याना निवेदन देने, पत्रकार परिषेदेचे आयोजन करणे, यासाठी 20 गावात अभियान राबवले, त्यामध्ये गावात काही अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी काम करीत आहेत, मसला गाव ची फाईल शेवटच्या दिवशी  गट साधन केंद्रात आली परंतु मंजूर होईल याची खात्री नव्हती , परंतु चोरमारे सरामुळे हे हंगामी वसतिगृह  मंजूर झाले, रोजचे मुलांचे जेवण नास्ता चे नियोजन करणे ही गरजेचे आहे, येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संकल्प तुमच्या सोबत आहे, स्थलांतरित पालकांच्या मुलांच्या खरा न्याय सुनील शेरकर यांनी प्रस्ताव साठी परिश्रम घेतल्यामुळे झाला हे खूप महत्वाचे आहे, पुढील 4 महिन्यासाठी हे वसतिगृह चालणार आहे, हे सर्व स्थलांतरीत पालकांच्या  मुलांना फायदा झाला, या कार्यक्रमास 69 मुले आणि शाळेचे शिक्षक उपस्थित  होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्यध्यापक खेत्रे सर,सतीश वाकसे, सुनील शेरकर, निर्मळ सर, सोळंके सर, यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...