सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

परभणीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन

परभणीत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन
परभणी(प्रतिनिधी)दि.26ः- पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, पत्रकार पेन्शन योजना त्वरित लागू करावी, नविन जाहिरात धोरण मागे घ्यावे या मागणीसाठी आज परभणी शहरात परभणी जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
      येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन तास आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकारांनी जोरदार घोषणा देऊन महाराष्ट्र शासनाचा निषेध केला. "हमे चाहिए पत्रकार सुरक्षा कानून', पेन्शन और मजिठीया' "मिडिया पे हमले बढ रहे है ।' पत्रकार सुरक्षा कानून कहां है ।' "पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे' "नवे जाहिरात धोरण रद्द करा' "ग्रामीण पत्रकारांना डावलणारे नियम बदला' आदी घोषणांनी परिसर दणानून गेला. यावेळी शहरातून सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांना मोठया प्रमाणावर एस.एम.एस. पाठवले. या नंतर पत्रकारांनी एका छोटे खानी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी पी.शिवाशंकर यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या धरणे आंदोलनास डॉ.आसाराम लोमटे, संतोष धारासुरकर, रमाकांत कुलकर्णी, ऍड.रमेश गोळेगावकर, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, नितीन धुत, सुरज कदम, प्रविण देशपांडे, राजकुमार हट्टेकर, नंदू प्रभूणे,  विनोद कापसीकर, लक्ष्मीकांत बनसोडे, प्रकाश साळवे, प्रभू दिपके, मोहन धारासुरकर, हनुमंत चिटणीस, कैलास चव्हाण, रोहन पावडे, शेख ईफतेखार, किरण स्वामी, लक्ष्मण मानोलीकर, आबासाहेब कड पाटील, सुधिर बोरडे, गजानन निशानकर, प्रविण चौधरी, आरूण रणखांबे, भूषण मोरे, एकनाथ गदम, रमेश नाटकर, विश्वजीत सत्वशे, सोमेश्वर लाहोरकर, नंदकूमार टेहरे, शिवशंकर सोनूने, मदन कोल्हे, मधुकर खंदारे, विवेक मुंदडा, उध्दव कड, देवानंद वाकळे, योगेश गौतम, राजेश बालटकर, विकास शिंदे, नरहरी चौधरी, गजानन देशमुख, विजयकुमार कुलदिपके, चंद्रकांत भुजबळ, दिनकर देशपांडे, संजय भराडे, शेख मुबारक, मंचक खंदारे, आर.आर.डागा, नरहरी चौधरी, विलास शिंदे, श्रीकांत देशमुख, संजय मंत्री, नामदेव सावळे, राजु सावळे आदी उपस्थित होते.
*प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना निवेदन*  
दरम्यान आज सायंकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे परभणीत आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांची भेट घेऊन आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या. खा.दानवे यांनी पत्रकारांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन यावेळी दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...