मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

कोनेरवाडीवासीयांनी जागवल्या शाहिद शुभमच्या आठवणी .

*कोनेरवाडीवासीयांनी जागवल्या शाहिद शुभमच्या आठवणी .......*

कोनेरवाडी ता .पालम/प्रतिनिधी : जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राचा जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे शहीद झाले होते .  तो परभणी जिल्ह्यातल्या कोनरेवाडीतला रहिवासी होता.
     पाकिस्ताननं काश्मीरमधल्या कृष्णा घाटी या भागात  शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी अवघ्या वीस वर्षांचा शुभम मस्तपुरेला वीरमरण आलं. शुभम मस्तपुरे हा भारतीय सैन्यातला धाडसी जवान होता. त्याच्या समरणार्थ व २६/११ च्या हल्ल्याच्या अनुषंगाने दि.२५ नोव्हेंबर रोजी  सकाळच्या सत्रात प्रथम शुभम मुस्तापूर यांच्या स्मारकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोनेरवाडीच्या सरपंच सरूबाई मुस्तापुरे  तर प्रमुख पाहुणे प्रा.भारत कदम, प्रा. आहिरे सर, ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर, प्राचार्य शिवाजी घालगीर ,प्रदीप जाधव, संगमेश्वर इरगुंडे होते, स्मारका शेजारी झाडे लावण्यात आले. दुपारच्या सत्रात रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यात मुलींनी शाहिद शुभम च्या आठवणी  रेखाटल्या  तर तिसऱ्या सत्रात "आठवणीतील शुभम" या विषयावर सुभाष ढगे सरांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. तिसऱ्या सत्रात  सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार करण्यात आला व शुभमच्या आई वडिलांना दिवाळीची चोळी बांगडी करण्यात आली. या कार्यक्रमाचे व्याख्याते सुभाष ढगे सर पुढे बोलताना म्हणाले कि शुभम जरी एका माईच्या पोटी जन्म घेऊन आला तरी तो पूर्ण भारत मातेचा सुपुत्र होंऊन गेला. म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसे शुभमच्या अंगी असलेले गुण मी शुभमला शिकवताना पहिले .त्याची अंगी असणारी देश भक्ती हि हजरो तरुणाची शक्ती निश्चित होईल असे ते म्हणाले .रात्री ८ ते १० वाजता "शहिदांच्या कविता " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात अनेक कवींनी शुभमच्या आठवणी कवितांच्या माध्यमातून मांडल्या .
यात सुप्रसिद्ध गझलकार आत्माराम जाधव यांनी

'शक्य होईल तेवढे बदलायचे आहे मला
या जगाला साजरे बनवायचे आहे मला
लाल रंगाचा सडा मी टाकतो सीमेवरी
तीन रंगाचे कफन कमवायचे आहे मला'

हि गझल सादर करून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आनले.
तर कवी शंकर कदम, परभणी यांनी
राखली तिरंग्याची शान
जरी चाळणी झाला देह
देश सेवे पुढे कुणाला
जगण्याचा होता मोह
हि रचना सादर केली

तर रामेश्वर किरडें यांनी
मोबाईल जाऊन आमच्या हातात
पुन्हा पुस्तक यायला पाहिजे
एक नाही हजार शुभम
रोज तयार व्हायला पाहिजे
हि कविता सादर करून तरुणांना देशसेवेची हाक  दिली.
विठ्ठल सातपुते यांनी हिंदी कविता सादर करून शुभमच्या आठवणी जागवल्या
"देश धरम पर मिटनेवाले
लाखो जवान शाहिद थे
फाशीपर चढणे वाले
भारत माँ के बेटे थे"
तर संतोष मोहजकर यांनी
पोटातला हुंदका ओठाआड किती दिवस दाबायचा
आसा सीमेवर जवान आजून किती दिवस जाळायचा
आणि महेश जोशी यांनी महागाई हि कविता सादर करून शेतकऱ्याचं जगन उपस्थितांसमोर मांडलं.
या कार्यक्रमाच्या  यशस्वीतेसाठी गावातील सरपंच, सर्व नागरिक तरुण मित्र तेच सुशांत किरडें, मुस्तापुरे सर, श्रीमंत पवार, फेरोज शेख, भंडारवाड सर, देविदास चोपडे, दामोदर बोन्नर ,पांडुरंग देवकते, बालाजी मोठे, राजेश जोगदंड आदींनी परिश्रम घेतले .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...