सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

पाथरी येथे भारतीय सविधान दिन उत्साहात साजरा. घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना केले वंदन

पाथरी येथे भारतीय सविधान दिन उत्साहात साजरा                                      घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना केले वंदन                                          पाथरी/प्रतीनिधी:  भारतीय सविधान दिनाच्या निमीत्ताने पाथरी येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन भारतीय सविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.              
        सविस्तर वृत असे कि भारतीय सविधान दिनाच्या निमीत्ताने संपुर्ण भारत देशा मध्ये शासकिय निमशासकिय व समाजीक संघटनेच्या वतीने भारतीय सविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात आहे याच सविधान दिनाच्या निमित्ताने दि.२६/११/२०१८ रोजी सकाळी १२ वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतूळा परिसर येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भारतीय सविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असुन या वेळी भारतीय सविधानाचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प हार आर्पन करुन वंदन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर हे होते तर प्रमुख उपस्थीती म्हणुन भारिप चे माजी मराठवाडा उपअध्यक्ष प्रकाश उजागरे,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,पत्रकार एल.आर.कदम,भारिप नेते शामराव ढवळे,डाॅ.एम.एम.मनेरे,डाॅ.अधिकार घुगे,माजी ता.अध्यक्ष शुध्दोधन शिंदे,बि.एन.वाघमारे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्यअध्यक्ष आवडाजी ढवळे,वैभव हरबडे आदी उपस्थीत होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...