गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८

भेटी गाठी..आपली माती ...आपली माणसं... *विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा

भेटी गाठी..आपली माती ...आपली माणसं...
*विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा संपन्न*
पाथरी -लक्ष्मण उजगरे
          श्रि साई स्मारक समिती पाथरी, राष्ट्रभक्ती संस्करण फाउंडेशन पिंपरी-चिंचवडव ओंकार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रि साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव समारोप वर्षे, राष्ट्रपिता महात्मा गांधी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षे पाथरी,मानवत, सोनपेठ,सेलु तालुक्यातील दीवाळी पाडवा शुभमुहूर्तावर यशस्वी व्यक्तींचा सन्मान सोहळा ८नोहेबंर गुरुवार रोजी श्रि साईबाबा जन्मस्थान पाथरी येथे घेण्यात आला.
                       सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, उद्योग, शेती,कला, क्रीडा, व्यापार,साहीत्यिक, धार्मिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय, पत्रकारिता, कामगार, वकील, प्राध्यापक, शैक्षणिक, संगणक, प्रशासकीय क्षेत्रात नाव कमावलेल्या व काम केलेल्या १५० व्यक्तींचा यथोचित सन्मान सोहळा श्री ह.भ.प.मणिषानंद महाराज (रुढी),श्रीविजयजी कत्रुवार,श्रीबालकीशन चांडक, श्री व्यंकटराव कदम,श्री.ए.बी.चिदुंरवार आदींच्या हस्ते सत्कार मुर्तीचा सन्मान करण्यात आला.
     सत्कार सोहळ्यासाठी पाथरी,मानवत, सोनपेठ,सेलु तालुक्यातुन सत्कार मुर्ती व सन्माननीय व्यक्तींची उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सत्कारमूर्तींना सन्मानपत्र, भेटवस्तू, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन साईबाबा मुर्तीसमोर सन्मान सोहळा अतिशय उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाची यशस्विता पाहुन सत्कार मुर्ती व उपस्थित मान्यवरांच्या चेहर्यावर सन्मानाची भावना दीसुन आली.
                कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मागिल दीड महीण्यापासुन डॉ.जगदीश शिंदे व नितीन चिलवंत यांनी अथक परिश्रम घेतलेव व कार्यक्रम यशस्वी केला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...