शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

संविधान बचाव मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.- दीलीप मोरे (युवाजिल्हाध्यक्ष भारिप)

संविधान बचाव मोर्चास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.- दीलीप मोरे (युवाजिल्हाध्यक्ष भारिप)
          परभणी प्रतिनिधी--
       --भारिप बहुजन महासंघ परभणीच्या वतिने भाजपा सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या उपस्थितीत राहण्याचे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे युवाजिल्हाध्यक्ष दीलीप मोरे यांनी केले आहे.
        भारिप बहुजन महासंघाचा संविधान बचाव मोर्चा चे आयोजन १६नोहेबंर रोजी करण्यात आले आहे या मोर्चाचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रविण कनकुटे हे करणार आहेत तर प्रमुख उपस्थिती डॉ प्रा सुरेश शेळके व प्रा.किशन चव्हाण पक्षनिरीक्षक हे राहणार आहेत.या मोर्चाच्या प्रमुख मागण्या मागासवर्गीय कर्मचार्यांना आरक्षण देण्याचा शासकीय आदेश महाराष्ट्र शासनाने तात्काळ काढावा, रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड करताना २०११च्या जनगणनची अट रद्द करावी व सर्वांना लाभ द्यावा अश्या विविध मागण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचा संविधान बचाव मोर्चास जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारिपचे युवाजिल्हाध्यक्ष दीलीप मोरे यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...