लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या मागणीला यश
मुंबई, दि. 13 : दुष्काळाची झळ सुसह्य करण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पिण्याचे पाणी राखून ठेवून पाणी शिल्लक राहिल्यास ते पाणी परभणीला देण्यात येईल आणि त्यातही प्राधान्य चारा पिकासाठी असेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना दिले.
परभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिशय कमी पर्जन्यमान झाले असल्याने दुष्काळाची परिस्थिती ओढवली असून शेतकऱ्यांना रब्बी व खरीप पिकांसाठी पाणी उपलब्ध नाही. हे लक्षात घेत भीषण पाणीटंचाई असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरी, सेलू, मानवत व जिंतूर या तालुक्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत दुधना प्रकल्पातून दोन पाळ्यांमध्ये पाणी सोडण्यात यावे, असे निर्देश जलसंपदा विभागाचे सचिव यांना श्री. रावते यांनी दिले तसेच त्यासंदर्भातील आदेश आजच काढण्याच्या सूचना केल्या.
श्री. रावते यांच्या पाठपुराव्यामुळे परभणीच्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी लोअर दुधना प्रकल्पातून प्रत्येकी 5 लक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे आदेश तात्काळ निघणार आहेत. परभणी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी कांतराव देशमुख यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार सदर पाण्याचा मोठा उपयोग परभणी जिल्ह्यातील रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांना होणार आहे. तसेच जनावरांना मोठ्या प्रमाणात चाराही उपलब्ध होणार आहे, असे श्री. रावते यांनी सांगितले.
मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१८
लोअर दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा