अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांच्या
पात्र अर्जदारांना कर्ज दिले जावे - नरेंद्र पाटील
परभणी, दि. 2 :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना राबवून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्राप्त संबंधित प्रकरणावर गांभिर्याने कार्यवाहीसाठी बँकांनी काळजी घ्यावी असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज महामंडळाचे अध्यक्ष श्री.पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी, शासकीय अधिकारी आणि संघटनांचे प्रतिनिधी, महामंडळाचे लाभार्थी यांची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटवार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, लिड बँकेचे व्यवस्थापक हाट्टेकर आदि उपस्थित होते.
श्री.पाटील म्हणाले, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनासह गट कर्ज व प्रकल्प कर्ज योजना राबविण्यात येत असून त्यामध्ये अधिक चांगले काम केले जाणे गरजेचे आहे. या योजनांमधील कर्जावरील व्याजाची रक्कम शासन भरणार आहे. याची राज्य शासनाने हमी घेतली असल्याने सदर योजनेतील प्रस्ताव बँकांनी वेळेत पूर्ण करावेत असे अध्यक्ष श्री.पाटील म्हणाले.
यावेळी विविध बँकांचे अधिकारी, लिड बँकेचे व्यवस्थापक, उपजिल्हाधिकारी श्री.कुंडेटवार यांनी जिल्ह्यातील माहिती दिली. या प्रसंगी विविध अर्जदारांनी अडचणी -प्रश्न यावेळी मांडले. तसेच त्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, विधिज्ञ आदिंनी आपले विचार व्यक्त केले.
रविवार, ४ नोव्हेंबर, २०१८
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांच्या पात्र अर्जदारांना कर्ज दिले जावे - नरेंद्र पाटील
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा