सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

पाथरी तहसीलवर मुकबधीरांचा धडकला मोर्चा

पाथरी तहसीलवर मुकबधीरांचा धडकला मोर्चा
-----------------------------------------------
प्रतीनिधी / प्रतिनिधी

पाथरी तालुक्यातील बांदरवाडा येथील एका दिव्यांग व मतिमंद असलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ परभणी जिल्हा मुकबधीर एकता असोसिएशन च्या वतीने पाथरी तहसील कार्यालयावर धडकला  मोर्चा
याबाबत माहिती अशी की,
      पाथरी तालुक्यातील मौजे बांदरवाडा येथील एका दिव्यांग व मतिमंद असलेल्या मुलीवर गेल्या चार ते पाच महिन्यापासुन सतत तीन आरोपींनी अत्याचार केले आहे.
सदर मुलीच्या दिव्यांग व मुकबधीर मतिमंदत्वाचा फायदा घेत सततच्या केलेल्या अत्याचाराने मुलगी गरोदर राहिल्याने सदरील प्रकार उघडकीस आला हि घटना माणुसकीला काळीमा फासणारी असुन या घटनेचा निषेधार्थ परभणी जिल्हा मुकबधीर असोसिएशन च्या वतीने रॅली काढुन  पाथरी तहसीलवर धडक मोर्चा काढण्यात आला
       यावेळी अत्याचार करणाऱ्या  नराधमांना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे तसेच पाथरी उपविभागीय अधिकारी यांना ही निवेदन देण्यात आले या निवेदनावर परभणी जिल्हा मुकबधिर एकता असोसिएशन यांच्या पदाधिका-यांची  नावे आहेत तसेच  या मोर्चात जिल्हाभरातील मोठ्या संख्याने मुकबधीरांची  उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...