गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

महात्मा फुले महामंडळ अंतर्गत थेट लाभ योजनांची चिट्ठी पद्धतीने पुनर्निवड करावी.

महात्मा फुले महामंडळ अंतर्गत थेट लाभ योजनांची चिट्ठी पद्धतीने पुनर्निवड करावी.

दिनांक( 13 फेब्रु)-महात्मा फुले विकास मंडाळात दि 13/2/2019 रोजी झालेल्या थेट कर्ज योजनेच्या  निवड रद्द करण्यासाठी  मा.उप जिल्हाअधिकारी डॉ. अंकुश पिनाटे यांना देण्यात आले.
महात्मा फुले विकास महामंडळ यांच्या कडून थेट कर्ज योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले, एकुण अर्ज 613 ऑनलाइन अर्ज  आले त्या मध्ये पुरुषाचे अर्ज 378 व महीलांनचे अर्ज 121व बाद झालेले अर्ज 114  या अर्जाची सोडत दि.13 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवन परभणी येथे करण्यात आले त्याचे काम महात्मा फुले  विकास मंडळ परभणी काम पाहाणार सचिव व त्यांचे सहकारी यांनी निवड प्रक्रियेला रँडम पद्धतीने करण्याचे ठरवले त्या मध्ये पुरुष 50% व महिला50% असे निकष ठरवण्यात आले या फार्मची तपासणी करून घेतली आहे .कामकाज पाहाणारे सचिव यांनी सभाग्रहातील आलेल्या लोकांना निवड  प्रक्रिया ची माहिती सांगून  114अर्ज आम्ही बाद केलेले आहेत व जे पात्र अर्ज आहेत त्या अर्जाची आपण सोडत करणार आहेत पण सोडत करत असताना परूषाच्या यादी मध्ये महिलाचे नावे दिसुन आले तर महीलांच्या यादी मध्ये पूरूषाचे नाव दिसुन येत होते, आलेल्या अर्जाची  कसल्याही प्रकारची तपासणी केलेली दिसुन आलेली नाही उलट जे लोक साहेबांना किवा त्याच्या सहकार्याला भेटून गेले आहेत अशा लोकांचे अर्ज या पद्धती मध्ये दिसुन येत होते सदरील योजने मध्ये गैर कारभार केल्याचे दिसुन आले त्या मुळे सभाग्रहातील लोकांनी ही पद्धत चुकीची आहे म्हटले गदारोळ केला असता तुम्हाला काय करायचे ते करा , आम्ही काहीच करू शकत नाही , व लाभार्थ्यांना अरेरावी ची भाशेत बोलत होते,
  निवड यादी प्रसिद्ध केली या निवड प्रकियाला विरोध करून मा.जिल्हा अधिकारी यांना ही निवड प्रकिया रद्द करून चिठ्ठी पद्धतीने करण्यात यावीआसे निवेदन देण्यात आले ही निवड प्रकिया रद्द न झाल्यास  सर्व लोक दि.26फेब्रुवारी रोजी जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचे निवेदनात म्हटले आहे.
या निवेनावर शामराव ढवळे गौतम साळवे बालासाहेब खोपे  राणु धोतरे, विजयमाला जाधव, संदिप पंडित, दिलीप गाडे, उत्तम लोखंडे राहुल पवळे अदि अर्जदाराच्या  सह्याआहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...