जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मतदान केंद्रास भेट:
गैरहजर बीएलओवर होणार कार्यवाही
.
24 फेब्रुवारी 2019 रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, उपविभागीय अधिकारी डॉ.सुचिता शिंदे, तहसिलदार विद्याचरण कडवकर यांच्यासमवेत जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी मतदान केंद्रास भेटी दिल्या असता बाभळी, पिंपरी देशमुख, मिरखेल, वरपुड, ताडलिमला, पिंगळी, पोरजवळा, माखणी, शेंद्रा, बलसा (खु), या मतदान केंद्रास भेट दिली असता भेटीच्या वेळी बाभळी येथील एस.ए.सुरवसे, पिंपरी देशमुख येथील व्ही.आर. बोरसे, वरपुड येथील रणवीर मारोती खंडेराव, पिंपरी देशमुख येथील एस.ए. लोखंडे, के.एम.बनसोडे, ताडलिमला येथील एन.डी.कदम आदि बीएलओ मतदान केंद्रावर गैरहजर होते. तर पोरजवळा येथील एम.एम.काळे, पिंगळी येथील श्री. निलपत्रेवार, शेंद्रा येथील श्री.फुलारी व श्री. कासलवार, बलसा (खु) येथील सोनाजी गायकवाड हजर होते.गैरहजर बीएलओंना कारणे दाखवा नोटिसा देवून खुलासा मागविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आदेशित केले व गैरहजर बीएलओंवर कार्यवाईचे निर्देशही दिले. असे परभणीचे निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी कळविले आहे.
2 व 3 मार्चला मतदान नोंदणी विशेष मोहिम
2 व 3 मार्च 2019 रोजी पुन्हा मतदार नोंदणी विशेष मोहिम घेण्यात येणार असून सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही हे तपासून घ्यावे आणि नाव नसेल तर मतदान केंद्रावर हजर असणाऱ्या बीएलओें जवळ नोंदणीचा नमुना 6 भरुन देण्यात यावा. तरी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा