रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

कासापुरी येथे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा देणार-अनिल नखाते

कासापुरी येथे विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा देणार-अनिल नखाते 

कासापुरी येथील नखाते विद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम.

पाथरी (प्रतिनिधी) कासापुरी व परीसरातील  विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण माध्यमिक शिक्षण  मिळावे यासाठी शांताबाई नखाते विद्यालयाच्या माध्यमातुन आमचा प्रयत्न चालू आहे.परंतू महाविद्यलयीन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुढील शैक्षणिक सत्रापासुन कासापुरी येथे स्वयंअर्थसहाय्य योजनेत आकरावी कला शाखा सुरू करणार अशी ग्वाही वाल्मिकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांनी दिली.

              पाथरी तालुक्यातील कासापुरी येथे  शांताबाई नखाते विद्यालयात २३ फेब्रुवारी रोजी आयोजीत  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभात अध्यक्षीय समारोप प्रसंगी अनिलराव नखाते बोलत होते व्यसपिठावर प्रमुख पाहुणे  पं.स.सभापती  राजेश ढगे ,कृउबास संचालक नारायणराव आढाव, रुस्तुमराव झुटे,पं.स.सदस्य  शरद कोल्हे ,जगदिशराव कोल्हे ता.अ.राष्ट्रवादी किसान सभा, सरपंच डिगांबर कोळसे रमेश वैराळ , जिजाभाऊ झुटे, रामप्रसाद कोल्हे,वाहेदखा पठाण, योगेश नवघरे ,भास्कर कोल्हे ,विठ्ठल कोल्हे , अजित कोल्हे यांची उपस्थिती होती.

           यावेळी बोलतांना अनिलराव नखाते म्हणाले की,विद्यार्थ्यांमध्ये  तांत्रीक व वैज्ञानिक दृष्टीकोन रूजवून त्यांनी भविष्यात स्वतः ची प्रगती करावी या उद्देशाने केंद्रशासनाकडुन मंजुर करून घेतलेल्या अटल टिंकरींग लँब चा शुभारंभ हि पुढील शैक्षणीक सत्रापासुन केला जाईल असे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेसाठी जिल्हा परीषद उपाध्यक्षा भावना नखाते यांचे  मार्फत सौर प्लँन्ट देण्यासाठी तसेच शिक्षण व आरोग्यसेवा उत्तम देणेसाठी मि  कटिबद्ध असल्याचे यावेळी बोलतांना अनिलराव नखाते यांनी सांगितले.

  याप्रसंगी एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक ,५ वी स्काँलरशिप धारक ,राज्यस्तरीय खेळाडूं या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

       मुख्याध्यापक प्रल्हाद शहारे यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचलन प्रकाश रोकडे यांनी केले.अहवाल वाचन बि.डी.दुधमोगरे तर डहाळके जे.एन. यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...