गुरुवार, २१ फेब्रुवारी, २०१९

वाघाळा येथे मुस्लिम समाजाने एकत्र येत केली शिवजयंती साजरी साजरी

वाघाळा येथे मुस्लिम समाजाने  एकत्र येत केली शिवजयंती साजरी साजरी.

    प्रतिनिधी_पाथरी:-वाचन साहित्य  मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.प्रत्येकाला शिक्षणाचं महत्व समजू लागले आहे. खरा इतिहास लोकां समोर येत आहे. यातून बिडत चालेले सामाजिक स्वास्थ अशा समजलेल्या इतिहासा मुळे आता प्रत्येक समाजातील युवकांना वाचना मुळे खरा इतिहास समजायला लागला असून आता महापुरूषांना जातीपातित न अडकवता हे राष्ट्र पुरूष सर्वांचे आहेत त्यांची कामगिरी सर्व समावेशक आहे

    सर्वांच्या कल्यानाचे कार्य या महापुरूषांनी केले असल्याची जानिव आता होऊ लागल्याचे चित्र आता पहावयास मिळत असून गुरूवारी २१फेब्रुवारी रोजी मुस्लिम समाजातील युवकांनी एकत्र येत वाघाळा ता पाथरी जि परभणी येथे एकत्र येत गावातील राष्ट्रपुरूषांच्या स्मारकांना अभिवादन करून वैचारीक शिवजयंती साजरी केली.


या गावातील मुस्लिम समाजाच्या युवकांनी एकत्र येत शहीद भगत सिंग वाचनालयाची दोन वर्षा पुर्वी वाघाळा गावात स्थापना केली या वाचनालया तर्फे विविध उपक्रम ते राबवत असतात याचाच एक भाग म्हणून या पुर्वी ग्रामस्थांनी तीन दिवसीय शिवजन्मोत्सवाचे आयोजन केले होते त्यात ही १७मुस्लिम युवकांनी रक्तदान केले आणि तीन दिवस चालेल्या विविध उपक्रमात सहभागी झाले.या नंतर गुरूवारी मुस्लिम समाजाने शहीद भगतसिंग वाचनालयाच्या वतीने शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयेजन केले होते. या वेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर आण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकांना अभिवादन करून शिवजन्मेत्सव साजरा केला.या वेळी प्रमुख व्याख्याते म्हणून स्व नितिन महाविद्यालय पाथरी तील समाजशास्र विभागाचे प्रा तुळशीदास काळे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी परमेश्वर अंबूरे हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून पत्रकार किरण घुंबरे यांची उपस्थिती होती. या वेळी या एैतिहासिक शिवजयंतीचे आयोजन केल्या बद्दल प्रा तुळशीदास काळे यांनी मुस्लिम समाजाचे अभिनंदन करून कौतूक करत शिवरायांच्या कार्यावर प्रकाश टाकला, या वेळी किरण घुंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. या साठी शेख रजाऊद्दीन, शेख आजमोद्दीन,शेख अनिस,शेख फकीर,शेख सुलतान ,शेख सलमान,शेख दगडू, शेख सलीम,शेख रफीक

शेख ईजास,आबुजर पठान, वसीम पठान,शेख जाफर ,शेख नायब,शेख ताजोद्दीन,शेख ईस्माईल, शेख शरीफ,शेख जखीर ,शेख अशफाक ,शेख हाफेज,परमेश्वर अंबुरे,सचीन अंबुरे,अनिल साळवे,सुशील साळवे,युवराज साळवे,आप्पाराव टिपरे,प्रशांत चाफाकानाडे यांनी  जयंती उत्सवा साठी परिश्रम घेतले. एकूनच या वर्षीचा शिवजन्मोत्सव पाथरी तालुक्यात एैतिहासिक ठरावा अशा प्रकारे साजरा झाल्याने सर्वत्र कुतूहल व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...