अभिनंदन...!
सदाशिव थोरात यांना शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहिर
प्रतिनिधी --पाथरी:-जन्मभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष सपोर्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन तथा सेंद्रिय शेती चे मार्गदर्शक प्रगतशिल शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते सदाशिव थोरात यांना शासनाच्या वतीने दिला जाणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी हा सर्वसाधारण गटा साठी दिला जाणारा सन 2015 चा मानाचा पुरस्कार शनिवार 2 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या आदेशा नुसार महाराष्ट्र शासनाचे उप सचिव डॉ किरण पाटील यांनी जाहिर केला आहे.
राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रा मध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्ती/संस्था यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषिभूषण(सेंद्रीय शेती) वसंतराव नाईक शेती मित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील,कृषि सेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा इत्यादी कृषी पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात येते. त्यास अनुसरून सन 2015-16 करीता चा सन 2015 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सदाशिव थोरात यांना घोषित झाल्याने शेतकरी,जन्मभूमी फाऊंडेशन परिवारातून आनंद व्यक्त करण्यात आला. करतुत्ववान योग्य व्यक्तीचा सन्मान केल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा कृषिआयुक्त पुणे या ठिकाणी आयोजित करण्याची जबाबदारी कृषी आयुक्ता वर शासनाने सोपवली आहे. सदाशिव थोरात यांना शासनाने हा पुरस्कार जाहिर केल्या बद्दल पाथरी तालुका शिक्षण मंडळाचे सचिव बालकिशनजी चांडक,अनिवासी सदस्य संपादक कृष्णा कोत्तावार, जन्मभूमी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र देशपांडे सचिव किरण घुंबरे पाटील सदस्य प्रा डॉ सुरेश सामाले अभियंते सतिष कोल्हे, श्रीधर लाडाने, नंदु नाईक,बालासाहेब काळे, संतोष काळें राजेश मोरे, दत्ता कापसे,अर्जून झुटे,पत्रकार माणिक केंद्रे,सिद्धार्थ वाव्हळे, प्रा गोपाल होगे पाटील, संपादक गोपाल लाड,हनुमान शिंदे शाम झाडगांवकर, लक्ष्मण साखरे, तुकाराम पौळ, कैलास जाधव, ग्रामविकास अधिकारी संदिपान घुंबरे, सपोर्ट फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गजानन घुंबरे पाटील, कोहीनुर कन्स्ट्रक्शन्स चे सय्यद गुलशेर खान मामा, साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष भारत धनले, गोदावरी दुधनाचे संचालक शेख सलीम यांच्या सह राजकिय क्षेत्र आणि शेतक-यां मधून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा