पाथरी प्रतिनिधी_शांताबाई नखाते विद्यालय कासापूरी येथे आज दिनांक 23/02/2019 रोजी गुणवंतांचा सत्कार व इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.अनिलभाऊ नखाते(सभापती , क्रुषिउत्पन्न बाजार समिती पाथरी ता .पाथरी जि .परभणी ) , प्रमुख पाहुणे श्री.राजेश ढगे , श्री .नारायणराव आढाव, रुस्तुम झूटे , शरद कोल्हे , डिगम्बर कोळसे (सरपंच ), रमेश वैराल (सरपंच ), जिजाभाऊ झुटे (सरपंच )योगेश नवघरे.जगदीश कोल्हे .रामप्रसाद कोल्हे .भास्कर झुटे .बिट्ठल कोल्हे .अजित कोल्हे .आदि मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे आध्यक्ष अनिलभाऊ नखाते यांनी मार्गदर्शन करतांनातांत्रिक शिक्षणाचे परिपूर्ण होऊन स्वतः च्या शिक्षणासोबत देशाचा विकास करण्याचे आवाहन केले .
या वर्षात दोन NMMS.शिष्यवृत्ती धारक , वर्ग 5वी चे 4विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक , क्रीडा क्षेत्रात जलतरण स्पर्धेत राज्यस्तरावर तर ड्र्व्स बॉल स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व गुणवंतांचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .प्रकाश रोकडे तर प्रास्ताविक श्री शहारे पी .एम .(मुख्यध्यापक )व अहवाल श्री .दूधमोंगरे बी.डी.तर आभार श्री .डहालके जे .ए .यांनी मानले .सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .जेवणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा