बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१९

पाथरी_पोखर्णी रस्त्यालगत अनधिकृत विट-भट्यांचा ऊत,त्यात विज चोरी व गौन खणीजाची चोरी प्रशासन मात्र झोपेत*

*पाथरी_पोखर्णी रस्त्यालगत अनधिकृत विट-भट्यांचा ऊत,त्यात विज चोरी व गौन खणीजाची चोरी प्रशासन मात्र झोपेत*

पाथरी/प्रतिनिधी (लक्ष्मण उजगरे)-पाथरी-पोखर्णी रस्त्यावर अवघ्या तीन कीलोमीटरच्या अंतरात तब्बल चौदा-पंधरा अनधिकृत विट-भट्या चालु आहेत याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष.

     या रस्त्यावर चक्क रस्त्याच्या हातभर अंतरावर भट्या लावून चक्क नियमांचे उल्लंघन करून ढाब्यावर टांगल्याचे दीसत आहे.त्यात आत्तातर या अनधिकृत विट-भट्टि मालकांनी मोठी कमालच केली आहे ती म्हणजे विजेवर (इलेक्ट्रॉनिक)चालणार्या विट थापण्यासाठी मशीन आनल्या आहेत.त्यामात्र विना कोटेशन(विज जोडणी)करता विज चोरी करून व्यवसाय सुरू केला.पुन्हा दुसरी कमाल म्हणजे विट थापण्यासाठी लागणारी माती कुठुन येते तर तीसुद्धा चोरीचीच असल्याचे समजते याकडे तहसिल प्रशासन,विज वितरण कंपनी जाणुन-बुजुन कींवा अर्थपुर्ण व्यवहार करुन दुर्लक्ष करतात असे दीसत आहे.

*ये-जा करणा-या नागरीकांच्या जिवाशी खेळ*

पाथरी-पोखर्णी रस्त्यावरून पोहेटाकळी,रेणापुर,वाघाळा, केकरजवळा इत्यादी गावातील नागरिकांना या विट-भट्यामुळे अनेक रोगांना सामोरे जावे लागते.या विट-भट्यांवर विट थापण्यासाठी थर्मल मधील राख वापरण्यात येते व ती मोकळ्या जागेत टाकली जाते ती राख हवेत द्वारे ये-जा करणाऱ्यांच्या  डोळ्यात,नाकात जाते.त्यामुळे रोगांना आमंत्रण मिळत.त्यात पुन्हा विषारी राख कोळसा वापरण्यात येत असल्याने विट-भट्टी मधुन धुरातुन कार्बनडाय बोनाक्साईड नावाचा विषारी वायू निघालो त्यामुळे श्वसनाचे विकार,ह्रदय, विकार, गर्भपात, डोळे आंधळेपणाला सामोरे जावं लागतं आहे.

  या विट-भट्यावर तहसिल प्रशासन,विज-वितरण कंपनी,वायु  प्रदुषण नियामक विभाग झोपेतच आहे का झोपेचं सोंग घेतात हे कळायला मात्र मार्गच उरला नाही.का अर्थपुर्ण व्यवहार करुन तहसिल प्रशासन, विज वितरण कंपनी या अनधिकृत विट-भट्यांना सहकार्य तर करत नाहीत ना????

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...