ज्ञानासह,कलेतही सक्षम व्हा.- भावनाताई नखाते
सेलू प्रतिनीधी- नूतन विद्यालयाच्या प्रार्थना मैदानावर शुक्रवार दि.२२ रोजी कै.श्रीरामजी भांगडीया रंगभरण स्पर्धेचे बक्षिस वितरण, राष्ट्रीय जंतूनाशक दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद परभणीच्या उपाध्यक्ष,शिक्षण आणि आरोग्य सभापती भावनाताई नखाते म्हणाल्या की,'विद्यार्थ्यांनी ज्ञानासह एखाद्या कलेतही सक्षम व्हावे.पदाधिकारी होण्यापेक्षा अधिकारी होण्याचे ध्येय बाळगावे.' कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वलाताई राठोड,जि.प.सदस्या इंद्रायणी रोडगे तर मंचावर आरोग्य अधिकारी डॉ.संजय हरबडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सोनवणे,प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अशोक गाजरे,पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे,रामकिशन मखमले यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना भावनाताई नखाते म्हणाल्या की,'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आरोग्यमय होतांनाच शालेय स्तरावरच्या विविध शिष्यवर्ती परीक्षा देत भविष्यातील स्पर्धा परीक्षेसाठी स्वतःला तयार करावे.' जंतूनाशक दिना निमित्ताने प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जंतूनाशक गोळी खाऊ घालण्यात आली. शिष्यवर्ती धारक आणि रंगभरण स्पर्धेतील विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहिली ते दहावी या चार गटात संपन्न झालेल्या रंगभरण स्पर्धेत पहिल्या गटात नूतन प्राथमीक शाळेची विद्यार्थीनी कु.देवयानी आडणे प्रथम, नूतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी चि.सोहम नेवरेकर द्वितीय,यासेर उर्दू प्रायमरिची विद्यार्थीनी कु.आयशा सिराज तृतीय, दुसय्रा गटात नूतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. हर्षिता चेचेडीया प्रथम,प्रिन्स अॅडमिचा विद्यार्थी चि.चेतन लखोटिया द्वितीय,स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कु.भक्ती काकडे तृतीय, तिसय्रा गटात नूतन विद्यालयाचा विद्यार्थी चि.स्वप्निल शिंदे प्रथम,ज्ञानतीर्थ विद्यालयाची विद्यार्थीनी कु.सृष्टी कच्छवे द्वितीय,नूतन कन्या प्रशालेची विद्यार्थीनी कु.धनश्री देशपांडे तृतीय, तर चौथ्या गटात नूतन विद्यालयाचे विद्यार्थी चि.विनोद आंबेकर प्रथम,चि.जगदीश जोशी द्वितीय व कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयाची विद्यार्थीनी कु.कल्याणी अंभुरे तृतीय बक्षिसाची मानकरी ठरली.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त माजी विद्यार्थी आशिष पवार यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपञ,सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी यांनी केले.सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन चिञकला विभाग प्रमुख किशोर कटारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फुलसिंग गावीत,कडगे,अनंतकुमार विश्वंभर,गणेश माळवे यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा