शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

आमदार मोहनभाऊ फड यांच्या आरोग्य शिबिरांस उत्स्फुर्त प्रतिसाद.

आमदार मोहनभाऊ फड यांच्या आरोग्य शिबिरांस उत्स्फुर्त प्रतिसाद.

      पाथरी प्रतिनिधी_ विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मोहनभाऊ फड यांनी मतदार संघाचे सुत्र हाती घेतल्या पासुन विकास कांमापासुन मतदार संघातील गोरगरीबांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यातीलच एक "आरोग्य सेवा हिच ईश्वर " ही योजना मोहनभाऊ फड यांच्या सक्रिय कार्यकर्त्यांमुळे घरोघरी पोहचलेली दिसत आहे. त्याचाच भाग म्हणुन आज मतदार संघातील प्रत्येक गावांगावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.   

असेच आणखीन एक सर्व रोगनिदान आरोग्य शिबिर दि. २३ /०२ /२०१९ रोजी परभणी तालुक्यातील पोरवड येथे ठेवण्यात आले होते.या शिबिरात एकुण ३०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली असता त्यापैकी मोतिबिंदु असलेले २७ रुग्ण व इतर आजाराचे १४ रुग्ण असे एकुण ४१ रुग्ण आढळुन आले. तरी या सर्व ४१ रुग्णांना पुढील उपचारासाठी मोहनभाऊ फड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई व पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. 

       

या शिबिराप्रसंगी शेख मुक्तार ,मुंजाजी सुर्यवंशी (पोलीस पाटील) रावण घाडगे, रोहिदास गिराम ,चंदा तिडके, आरोग्य सेवक पप्पू नखाते ,बाबा शेख ,अमोल सूर्यवंशी ,अमोल बोराटे यांनी मोलाचे सहकार्य केले तर या शिबिरात डॉ निलंगेकर व  डॉ. रोहित स्वामी यांनी सर्व रुग्णांची तपासणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...