शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे शिवजयंती साजरी
*शिवजन्मोत्सव सोहळ्यात व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.....*
पाथरी-प्रतिनीधी(धम्मपाल उजगरे) वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अनिलभाऊ नखाते हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्रीमती भाग्यश्री देशमुख(तहसिलदार,पाथरी),कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.नारायणराव आढाव,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.भगिरथ टाकळकर,मा.सौ.डाॅ.गोदावरी जाधव ,मा.सौ.भाग्यश्रीताई टेंगसे,मा.सौ.उषाताई डुकरे ह्या तर प्रमुख व्याख्याते म्हणून मा.श्री.सतिश घुंबरे हे उपस्थित होते.
शिववंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.श्री.सतिश घुंबरे यांनी आपल्या ओघवत्या वाणीतुन शिवचारिञ्यावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात विरमरण आलेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरिञावर पोवाडा,नृत्य,भाषण,बालशिवाजी आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन केले.कार्यक्रमाचे सुञसंचालन गोपाल आम्ले व सौ.सुप्रिया झिंजाण यांनी केले.कार्यक्रमास विद्यार्थी,माता पालक,शिक्षक वृंद उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा