म.राज्य ग्रंथालय कृती समितीचे अध्यक्ष रविंद्र कामत दि.२१ फेब्रुवारी पासुन ग्रंथालयाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कराड येथे अमरण उपोषणास बसणार
उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सोनपेठ तालूका ग्रंथालय कर्मचारीही कराडला जान्यासाठी सज्ज
सोनपेठ (प्रतिनीधी) दि.१८फेब्रुवारी २०१९
सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालयांच्या प्रलंबित विविध मागन्यांसाठी महाराष्ट्रात राज्य ग्रंथालय कृती समितीचे अध्यक्ष तथा ग्रंथपाल रविंद्र कामत हे दि.२१ फेब्रुवारी पासुन सातारा जिल्ह्यातील कराड येथे अमरण उपोषणास सुरुवात करनार आहेत
त्यांना पाठींबा देऊन उपोषणात सहभागी होन्यासाठी सोनपेठ तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी बुधवार दि.२० फेब्रुवारी रोजी कराड येथे जाण्यासाठी सज्ज असल्याची माहीती देन्यात आली आहे.
मागील आनेक वर्षांपासुन सार्वजनीक ग्रंथालयांचे आनुदान वाढ करणे, नविन ग्रंथालयांना मान्यता देणे, दर्जा वाढ करने, कर्मचऱ्यांना वेतन श्रेणी लागु करणे आदी प्रलंबित मागण्यांसाठी ग्रंथालयांच्या विविध संघटनांकडून शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे; परंतु सार्वजनिक ग्रंथालयांच्या या महत्वपूर्ण जीवन मरणाच्या मागण्यांकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष होतांना दिसत असुन, यामुळे गांव तिथे ग्रंथालय या चळवळीस खिळ बसल्याचे दिसुन येत आहे. मागील कांही वर्षांपासुन महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समिती कडून ग्रंथालयीन मागन्या मान्य करन्यासाठी विविध अंदोलने करुन शासनास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतू शासन याप्रश्नाकडे डोळेझाक करीत आहे.
ग्रंथालये व वाचन संस्कृती जोपासण्यात अग्रस्थानी असलेल्या ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सार्वजनीक वाचनालयाचे ग्रंथपाल तथा ग्रंथालय कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रविंद्र कामत यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावत, कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबीला आहे. ग्रंथालयीन सर्व मागन्या शासनाने त्वरीत मान्य कराव्यात यासाठी ते गुरुवार दि.२१ फेब्रुवारी पासुन कराड येथे अमरण उपोषणास बसनार आहेत. त्यांच्या या अंदोलनास एक दिवशीय पाठींबा म्हणुन उपोषणात सहभागी होन्यासाठी सोनपेठ तालुक्यातून अनेक ग्रंथालयीन कर्मचारी जानार असल्याची माहिती ग्रंथालय कृती समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष ए.बी.शिंदे, उपाध्यक्ष बाबासाहेब गर्जे, रमेश मुलगीर, हनुमान कुरे यांनी दिली आहे. आतातरी शासनाने ग्रंथालये व ग्रंथालयातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी भावना सर्वसामान्य वाचक वर्गातून होत असल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा