गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

सदाशिव थोरात यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते वितरण .

सदाशिव थोरात यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे राज्यपालांच्या हस्ते वितरण

प्रतिनिधपाथरी:-महाराष्ट्र शासनाच्या कृषी व फलोत्पादन विभागाच्या वतीने सन २०१५-१६ मधील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात उकृष्ठ व उल्लेखनीय कार्यकरणा-या  शेतकरी व अधिकारी यांचा राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते सत्कार व पुरस्कार वितरण समारंभ श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल वेटलिप्टींग हॉल मध्ये म्हाळूंगे-बालेवाडी  पुणे येथे गुरूवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११वा. संपन्न झाला.
या वेळी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील सारोळा येथिल रहीवाशी असलेले सदाशिव नाथा थोरात यांना राज्यपाल मोहदयांच्या हस्ते शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या सोहळ्या साठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषधी प्रशासन ,सांसदीय कार्यमंत्री गिरिष बापट,सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य मदत व पुनर्वसन मंत्री दिलीप कांबळे तसेच कृषी व फलोत्पादन, महसुल व पुनर्वसन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कृषी व फलेत्पादन सचिव एकनाथ डवले, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राष्ट्रगिताने या सेहळ्याची सुरूवात झाली.कृषीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रास्ताविकातुन राज्यभरातून आलेल्या पुरस्कार प्राप्त शेतक-यांना  शुभेच्छा दिल्या नंतर पुरस्कार वितरण सोहळा सुरू झाला. ,,या नंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी शेतक-यां  मुळेच देश अन्न धान्यात पुढे आल्याचे गौरोदगार काढले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आभार मानले. सदाशिव थोरात यांच्या सह राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रा मध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या व्यक्ती/संस्था यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषीभूषण, कृषिभूषण(सेंद्रीय शेती) वसंतराव नाईक शेती मित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील,कृषि सेवारत्न पुरस्कार व राज्यस्तरीय पीक स्पर्धा इत्यादी कृषी पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात ,आले.  सन 2015-16 करीता राज्यभरातून आलेले पुरस्कार प्राप्त शेतकरी, अधिकारी, कर्मचारी आणि शेतक-यांचे  नातेवाईक उपस्थित होते. सदाशिव थोरात यांचा शासनाने पुरस्कार देऊन गौरव केल्याने पाथरी तालुक्यातुन सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...