रविवार, २४ फेब्रुवारी, २०१९

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ,एकही लाभार्थी वंचित राहणार नाही – जिल्हाधिकारी पी.शिवशंकर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ


एकही लाभार्थी वंचित राहणार नाही – जिल्हाधिकारी पी.शिवशंकर


परभणी/प्रतिनिधी_. 24 – शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपुर,उत्तर प्रदेश येथे आज करण्यात आला. त्यांचे थेट प्रक्षेपण परभणी येथे आयोजित करण्यात आले होते.


या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की,या योजनेचे काम कशा पध्दतीने यंत्रणेने मीशन मोडवर दिवसरात्र काम करुन पूर्ण केल्याचे सांगून यापुढे कोणताही पात्र लाभार्थी वंचित रहाणार नाही असेही सांगितले.

कार्यक्रमांचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सागरजी खटकाळे यांनी केले तर सुत्र संचलन शंकर रेंगे यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...