पाथरी-परभणी) – सततची नापीकी बॅंकेच्या कर्जाचा वाढता डोंगर त्यात मुलीचे लग्न कसे करणार घरचा उदरनिर्वाह कसा चालवायचा सतत याच विवंचनेत असणाऱ्या 42 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषधी प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवार २६ ऑगष्ठ रोजी पाथरी तालूक्यातील लोणी सुरताबाई तांडा येथे घडली असून या प्रकरणी पाथरी पोलिसात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रां कडून मिळालेल्या माहिती नूसार पाथरी तालूक्यातील लोणी ( बु ) अंतर्गत येणाऱ्या सुरताबाई तांडा येथील ४२ वर्षीय शेतकरी विष्णू हरीभाऊ राठोड यांची लोणी शिवारात ६० आर शेती असून पत्नी, दोन मुल आणि एक मुलगी असा परीवार असून मागील काही वर्षा पासुन सततची नापीकी त्यात बँकेचे घेतले कर्जाचा वाढत चाललेला डोंगर यामुळे घर चालवने दिवसें दिवस कठीण होत चालल्याने पैशा अभावी मोठ्या मुलाला बारावी पासुन शिक्षण सोडण्याची वेळ आली. तर मुलगी लग्नाला आल्याने लग्नाचा मोठा खर्च कूठून करायचा सतत याच विवंचनेत असणाऱ्या विष्णू राठोड या शेतकऱ्याने रविवार २६ ऑगष्ठ दिवशी सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली या प्रकरणी आशामती विष्णू राठोड यांच्या खबरे वरून पाथरी पोलीसात १७४ सीआरपीसी नुसार आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवार, २६ ऑगस्ट, २०१८
पाथरी तालुक्यातील सुरताबाई तांडा येथिल शेतकर्याची आत्महत्या
संविधानानुसार सर्वांना माणुस म्हणुनि जगण्याचा अधिकार प्राप्त असल्याने संविधानाचे रक्षण करणे आवश्यक -कन्हैया कुमार
जिंतूर :- “संविधान बचाव देश बचाव” या अभियानास जिंतूर येथे प्रचंड मोठ्या स्वरुपात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विजयराव भांबळेतर प्रमुख वक्ते म्हणून जे.एन.यु. चे माजी सांसद श्री. कन्हैया कुमार हे होते तर प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्षा उज्वलाताई राठोड, सभापती अशोकराव काकडे, राजन क्षीरसागर, प्रा.डॉ.आव्हाड, आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना आ.विजय भांबळे यांनी करत कन्हैया कुमार सारखा एक विद्यार्थी केवळ प्रचलित व्यवस्थे विरुध्द बोलून संविधानानुसार सर्वाना समान वागणूक मिळावी, हाताला काम मिळावे, जाती-जातीमध्ये बंधुभाव राहावा म्हणून प्रयत्न करत असून सध्याच्या देशातील वातावरणानुसार सरकारचे अपयश लपविण्यासाठी व सत्य बोलणाऱ्यास देशद्रोही तर संविधानाची प्रत जळणाऱ्याचे विरुद्ध कोणतीच कारवाई हे सरकार मुद्दामहोऊन करत नाही असे सांगत सर्वांनी एकत्रित राहावे असे आवाहन केले.
अनेक महापुरुषांनी एकत्रित येऊन इंग्रजांचे विरुद्ध महत्वपूर्ण लढा देऊन, बलिदान देऊन देशाला स्वतंत्र मिळवून दिले. या देशातील राज्यघटनेने सर्वाना समान अधिकार दिलेला असताना जाती-जातीत विषमता निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सरकार करत असल्याचे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेबांचा ब अनेक महापुरुषांचा भगवा रंग वेगळा होता हे सांगत गांधीजी सारख्यावर गोळ्या झाडून मनुवादी लोकांनी गोडसेचे गुण गायला सुरवात केली . त्याचबरोबर सर्वाना समान अधिकार मिळाले पाहिजे, सर्व समाजाचे मागणीनुसार आरक्षण देण्यात यावे, प्रत्येकाला सन्मानाने जगता आले पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करणे आपले काम आहे असे सांगत “हटा संविधान तो गया हिंदुस्थान” हा नवा नारा देत अनेक दाखले देऊन सरकारवर मोदीवर सडकून टीका केली आणि सर्वाना सहभागी करत आझादीचे गीताने आपल्या भाषणाची सांगता केली. कार्यक्रमासाठी सर्व समाजाचे संघटना, धार्मिक संघटना उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अँड.विनोद राठोड यांनी केले तर कार्यक्रम जलील मौलाना,मुक्तीबेग मौलाना,ताजजमुल मौलाना,शिराज मौलाना,नानासाहेब राऊत ,प्रसादराव बुधवत, विसवनाथ राठोड,हेमंत राव अडलकर,कपिल भाई फारुकी,अजय चौधरी,अशोक काकडे विनायकराव पावडे, विठलं राव घोगरे मुरलीधर जी मते ,रामरावजी उबाळे ,मधूकरजी भवाले,विजय खिस्ते,सर्व सन्माननीय न प सदस्य,प सल सदस्य,सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज थिटे, पप्पू मते, अभिनय राउत, मनोहर डोईफोडे, शरद मस्के, उस्मान पठाण, दलमीर खान, शौकत लाला, संदीप राठोड, संजय काळे, बालाजी नव्हाट, रवी होडबे आदींनी प्रयत्न केले.
कन्हैया कुमारच्या जिंतुर येथिल जाहीर सभेला आ.बाबाजाणीदुर्राणी,सुरेश वरपुडकरसहीत राँ.का.चे बरेच नेते गैरहजर
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिंतूर येथील आमदार विजय भांबळे यांनी आयोजित केलेल्या कन्हैया कुमार च्या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील बडे नेते अनुपस्थितीत असल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे...जिंतूरतील सभेसाठी हे नेते का पोहचू शकले नाहीत यावर चर्चा सुरु आहे .. विशेष म्हणजे पक्षाचे भांबळे वगळता एकही आमदार येथे उपस्थित झाले नाहीत ..
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते कन्हैया कुमार च्या उपस्थितीत झालेल्या जिंतूर येथील सभेसाठी गैरहजर होते....
. परभणी आणि पाथरी या दोन ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले अनेक नेते गैरहजर असल्यामुळे याच सभेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती जिल्हाध्यक्षांनी आमदार विजय भांबळे यांची सभा का टाळली असा प्रश्न उपस्थित झाला आहे उत्तर मात्र अजून मिळाली नाही...... विशेष म्हणजे अंधार भावे यांनी ही सभा आयोजित केली होती तरीदेखील जिल्हाध्यक्ष गैरहजर राहिले या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही....
संविधान बचाव देश बचाव” या अभियानास जिंतूर येथे प नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. विजयराव भांबळे तर प्रमुख वक्ते म्हणून जे.एन.यु. चे माजी सांसद . कन्हैया कुमार हे होते तर प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्षा उज्वलाताई राठोड, सभापती अशोकराव काकडे, राजन क्षीरसागर, प्रा.डॉ.आव्हाड, आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना आ.विजय भांबळे यांनी करत कन्हैया कुमार सारखा एक विद्यार्थी केवळ प्रचलित व्यवस्थे विरुध्द बोलून संविधानानुसार सर्वाना समान वागणूक मिळावी, हाताला काम मिळावे, जाती-जातीमध्ये बंधुभाव राहावा म्हणून प्रयत्न करत असल्याचे सांगितले....
कन्हया कुमारने
अनेक दाखले देऊन सरकारवर मोदीवर सडकून टीका केली आणि सर्वाना सहभागी करत आझादीचे गीताने आपल्या भाषणाची सांगता केली.
कार्यक्रमासाठी सर्व समाजाचे संघटना, धार्मिक संघटना उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अँड.विनोद राठोड यांनी केले तर कार्यक्रम जलील मौलाना,मुक्तीबेग मौलाना,ताजजमुल मौलाना,शिराज मौलाना,नानासाहेब राऊत ,प्रसादराव बुधवत, विसवनाथ राठोड,हेमंत राव अडलकर,कपिल फारुकी,अजय चौधरी,अशोक काकडे विनायकराव पावडे, विठलं राव घोगरे मुरलीधर मते ,रामराव उबाळे ,मधूकर भवाले,विजय खिस्ते,सर्व न प सदस्य,प सल सदस्य,सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज थिटे, पप्पू मते, अभिनय राउत, मनोहर डोईफोडे, शरद मस्के, उस्मान पठाण, दलमीर खान, शौकत लाला, संदीप राठोड, संजय काळे, बालाजी नव्हाट, रवी होडबे आदींनी प्रयत्न केले.
शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८
कर्जाला कंटाळुन कान्सुर येथिल तरुण शेतकर्याची आत्महत्या
लक्ष्मण उजगरे-पाथरी प्रतिनिधी वडिलांकडे असलेलं कर्ज आणि नापीक याला कंटाळून तालुक्यातील कान्सूर येथील एका २८ वर्षीय तरूनाने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना घडली. कान्सूर येथील आशोक लक्ष्मण गिरगुने वय २८ या तरून शेतक-याने सततची नापीकी आणि बँकेचे कर्ज याला कंटाळून स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळाफास घेऊन आत्महात्या केली.
आशोक गिरगुने याला अजून दोन भाऊ असून आई वडील, पत्नी दोन मुले असल्याचे सांगण्यात येते या संपुर्ण कुटूंबात साडेचार एकर जमिन असून त्याच्यावर बँकेचे कर्ज असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे. या विषयी आशोक गिरगुने यांनी आपण कर्जाला कंटाळून आत्महात्या करत असल्याची चिठ्ठी खिशात लिहून ठेवली होती, असेही सांगण्यात आले. या विषयी त्याचा भाऊ परमेश्वर लक्ष्मण गिरगुने यांच्या फिर्यादेवरून पाथरी पोलीसात नोंद झाली असून, शवाची उत्तरीय तपासनी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
रोटरी क्लबच्या वतिने नेताजी सुभाष विद्यालयात आरोग्य तपासणी
आज नेताजी सुभाष विद्यालय मध्ये रोटरी क्लब पाथरी - मानवतच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी , प्रत्येक विद्यार्थ्यास त्याचे ब्लड ग्रुप कार्ड , व्हिटॅमिन A/D तसेच मुलांमधील हृदयाच्या आजाराचे निदान व त्यावरील मोफत शास्त्रक्रियेसाठीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले . शाळेमधील सर्व 1200 विध्यार्त्यांना या शिबिराचा लाभ मिळाला आहे. डॉ .अतुल भाले ,डॉ.निवृत्ती पवार ,डॉ.प्रशांत सासवडे ,डॉ.प्रमोद गौड, डॉ .सचिन कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन D च्या गोळ्या वाटप केल्या . डॉ जगदीश शिंदे मुलांमधील हृदयाचे आजाराचे निदान व त्यावरील मोफत शास्त्रक्रिये साठी रोटरी क्लब पाथरी - माध्यमातून संपूर्ण सहकार्य करणार आहेत . या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रिन्सिपल कांबळे सर ,शिवराज नाईक सर व सर्व शाळेतील शिक्षक वृंदाचे पूर्ण सहकार्य लाभले. रोटरी क्लब पाथरी -मानवत च्या या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील 1लाख विध्यार्थ्यांना होणार आहे . या कार्यक्रमाला क्लब चे सचिव श्री सुभाष बारहाते साहेब ,सरपंच संतोषराव लाडाने ,नगर सेवक अलोक चवधरी ,मोतीराम निकम ,अनिल गोंगे ,पप्पू चिलवंत , बाळासाहेब दुबाले डॉ .भोसले ,डॉ.जाधव,कैलाश कसबकर , अशोकराव कुटे ,संजय पामे,अतुल टेकाळे ,भगवान ढवळशंक ,जगदीशजी राठी आदींची उपस्थिती लाभली
बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८
मानवत येथे पन्नास हजार चारशे रुपयाची गंठण हिसकावून अज्ञात चोरटे पसार झाले
सविस्तर वृत्त अशी की,मानवत येथील गोदूल्ली येथिल रहिवाशी महिला सौ.शिवकन्या अक्षय मोरे ह्या
दुपारी दोन-अडीचच्या सुमारास बाजारात सामायन खरेदी करून घरी पायी जात होत्या व त्याच्या सोबत त्यांच्या मैञीन
ऋतुजा पाटील हि सोबत होत्या यावेळी दोन ईसम काळे टि शर्ट घातलेले व बल्यु पँन्ट घातलेले वय २५ ते २८ वर्ष विना नंबर मोटरसायकल वर मागे बसलेल्या अज्ञात व्यक्तिचे केस वाढलेले हे मोटरसायकल वर भरधाव वेगाने समोरुन आले व त्यांनी महिलांच्या गळ्यातील गंठन ओढुन मोटरसायकल वर पळुन जात आसताना महिलांच्या हातात दोन ग्राम सोन्याचे डोरले राहिले व त्यानी घाबरून आरडाओरडा केला असता गल्लीतुन जाणारे एका व्यकतीने मदतीला येऊन पळत मोटरसायकल चा पाठलाग केला परंतु चोरटे तुटलेले गंठण घेऊन पळुन गेले या प्रकरणी सौ.शिवकन्या अक्षय मोरे यांच्या तक्रारीवरुन मानवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१६०/१८ कलम ३७९ ,३४ भा.द.वि.अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास बिट जमादार प्रताप साळवने हे करीत आहे
कन्हैयाकुमारला परभणी जिल्ह्यात प्रवेश देऊ नका....एसपींना शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ.संजय कच्छवे भेटले
दिल्लीच्या विश्वविद्यालयात ," भारत तेरे तुकडे होंगे हजार ." ..
कश्मीर मांगे आजादी " ..
हमे चाहीये कश्मीर की आजादी ..
अशा संतापजनक घोषणा दिल्लीत देणारा ..
ज्याच्यावर " खटला न्यायालयात चालु आहे " .. ..
जो चिथावणीखोर भाषण करतो ..
जो सामाजीक , धार्मिक सलोखा बिघडवतो ..
अशा कन्हैयाकुमार चे भाषण व कार्यक्रम परभणी व पार्थपुर (पाथरी) येथे अशाच देशद्रोही , राष्ट्रविरोधी मंडळींनी आयोजीत केले आहेत .. करा परभणी जिल्ह्यात प्रवेश देऊ नये अशा आशयाचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर संजय कचवे यांनी पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे दिल्याची माहिती मिळाली आहे...
शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ.संजय कच्छवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन अशा देशद्रोही व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश करू देऊ नये अन्यथा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल ..
तसेच अशे देशविघातक कार्यक्रम आयोजीत करणारांवरही कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुन्हा कोणीही असा प्रयत्न करण्यास धजावणार नाही ..
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख डाॅ.संजय कच्छवे , तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले, तालुका संघटक प्रल्हादराव लाड, युवासेनेचे सचिन राष्ट्रकुट, सोपानराव कच्छवे, सरपंच अमरदिप नागोरे, रोहीत अंधारे , अनिकेत देशमुख , सचिन जांबकर , संजय जाधव व शिवसैनिक उपस्थितहोते
मेघना बोर्डीकर आज पाथरी तालुक्यातील गावागावात; थेट गावकऱ्यांशी साधला संवाद
मेघना बोर्डीकर आज पाथरी तालुक्यातील गावागावात; थेट गावकऱ्यांशी साधला संवाद
मेघना बोर्डीकर आज पाथरी तालुक्यातील गावागावात; थेट गावकऱ्यांशी साधला संवाद.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या युवा नेत्यां मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी पाथरी तालुक्यातील गावांना भेटी दिल्यात..... भारतीय जनता पक्षाचे तालुक्यातील कार्यकर्ते यांनी पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.....
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्या इच्छुक उमेदवार आहेत त्यादृष्टीने त्यांनी पाथरी तालुक्यातील केकरजवळा कानसुर टाकळगव्हाण आदी गावातील गावकऱ्यांची थेट संवाद साधला....
भारताचे स्व.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजी यांना स्मरण करून त्यांना पाथरी तालुक्यातील टाकळग्हान, केकर जवळा, कानसुर या ग्रामीण भागात भावपुर्ण श्रध्दांजली देण्यात आली या वेळी .
मेघनादिदी बोर्डीकर, डाॅ उमेश देशमुख, पि.डी.पाटील, डाॅ राठी,रंगनाथ सोंळके,हनुमान घुबंरे, सुभाषराव आंबट बाळासाहेब मते,मोहन कदम व सर्व गावातील सरपंच ऊपसरपंच व सर्व कार्यकर्ते सह गावकरी उपस्थित होते
मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८
राहुल ढगे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने संन्मानित.
वराहुल ढगे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने संन्मानित. परभणी- विक्रम शिला हींदी विद्यापिठाच्या वतिने देण्यात येणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार पाथरी येथिल राहुल ढगे यांना देण्यात आला आहे.
सविस्तर व्रत्त असे की,राज्यस्तरीय तिसरे साहीत्य सम्मेलन व सारस्वत सन्मान समारोह दी १९ आँगष्ट रविवार रोजी डेक्कन महाविद्यालय सभागृह केन्द्रीय विद्यालय आंळदी रोड येथे,प्रो.वंसत शिंदे डेक्कन काँलेज कुलगुरु यांच्या अध्यक्षते खाली व उद्घाटक म्हणुन लाभलेले सुमनभाई उज्जैन कुलाधिपति विक्रमशिला विद्यापिठ भागलपुर बिहार यांच्या हस्थे करण्यात आले.मुख्य अथिती म्हणुन डाँ.तेजनारायन कुशावाह,डाँ.देवेंन्द्र नाथ शाह,डाँ.प्रेमचंद पांडे,डाँ.महेन्द्र मंयक,डाँ.दीपंकर कुमार बियोगी,श्रि प्रितमकुमार देंवेन्द्र शाह यांच्या उपस्थित पाथरी पाथरी येथिल विविध सामाजिक कार्यात सहभागी होणारे राहुल ढगे यांना डाँ.देवेन्द्र साह भागलपुर विद्यापिठ कर्मा कुल सचिव व डाँ.प्रेमचंद पांडे उपकुलसचिव विक्रम शिला विद्यापिठ भागलपुर यांच्या हस्थे देण्यात आला
.राहुल ढगे यांचे त्यांच्या मित्रपरीवारातील अजय थोरे पंचायत समिती सदस्य,सुनिल पितळे,प्रताप टेकाळे,सुनिल खिल्लारे,सुधाकर ढगे,बापुराव टेकाळे,लक्ष्मिकांत थोरे सर,अशोक मनेरे,भास्कर अंभोरे,अँड.दीनकर थोरे आदींनी अभिनंदन केले.
शैक्षणिक गुनवत्तेत वाढी होण्यासाठी शिक्षकांनी प्रयन्त करणे गरजेच-शिक्षणाधिकारी कुंडगीर
शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे
-शिक्षणाधिकारी कुंडगीर
गंगाखेड (प्रतिनिधी)-
मुलंही पालकांनी शिक्षणासाठी ताब्यात अति विश्वासाने दिलेली संपत्ती असून त्याला तडा न जाऊ देता शिक्षकांनी पालकांचा विश्वास संपादन करण्यासोबतच मुलांवर शैक्षणिक संस्कार आणि संगोपनातून गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यवतमाळचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी गंगाखेड येथे मंगळवार (दिनांक 21) रोजी ‘करिअर मार्गदर्शन मेळावा’ प्रसंगी गंगाखेड येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संयोजिका सौ. राजेश्रीताई जामगे या होत्या.
ग्रामीण पत्रकार संघ व सरस्वती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वर्ग आठवी, नववी ,दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर मार्गदर्शन मेळाव्या’चे आयोजन समर्थ गंगाधर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. पुढे बोलताना कुंडगीर म्हणाले, सध्या मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अनिष्ट गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आपला पाल्य काय करतो आहे याची खबरदारी पालकांनीही वेळोवेळी घ्यायला हवी.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सोहन माछरे, शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तापडिया, मेजर विश्वनाथ सातपुते ,लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचे अध्यक्ष दगडुलाल सोमाणी, पंचायत समितीचे शाखा अभियंता दीपक पाटील, प्रा. सौ. जयश्री पछाडे हे मान्यवर उपस्थित होते .
गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर इंगळे व सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक राम पाठक यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक गंगाधर कुलकर्णी यांनी केले. मेळाव्यात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी विद्यार्थ्यांना विचार करून योग्य करिअर निवडावे जेणे करून आपले भविष्य उज्वल होईल असे सांगितले. जयश्री पछाडे यांनी मेडिकल, इंजिनिअर या व्यतिरिक्त ही इतर क्षेत्र आहेत ज्यात विद्यार्थ्यांना करिअर करता येते असे सांगितले.
दहावीची परीक्षा देताना विद्यार्थी दशेतील हा टर्निंग पॉइंट असतो त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी अभ्यास मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात सौ. राजेश्रीताई जामगे यांनी केले.
यावेळी ‘काहूर’ने काढलेल्या शैक्षणिक विशेषांकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर इंगळे, संस्थापक रमेश कातकडे, सचिव विकास साळवे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन योगशिक्षक गोपाल मंत्री यांनी केले.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षक त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
अंगणवाडी सेविका आणी मदतनबीस यांच्या परभणी जिल्हापरीषदेवर जबरदस्त मोर्चा,सिओंना घेराव
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा परिषदेवर जबरदस्त मोर्चा धडकलाय....... मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेय.......
या आठ दिवसांमध्ये हा प्रश्न अधिकाऱ्यांनी सोडवला नाहीतर यापेक्षाही मोर्चा काढू असा खणखणीत इशाराही देण्यात आला आहे अधिकाऱ्यांनी वेळेवर कामे करावीत अंगणवाडी सेविकांची समस्या तातडीने जाणून घेऊन सोडविण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली
यासंदर्भात आठ दिवसांमध्ये चौकशी करून योग्य न्याय दिला जाईल अशी हमी दिल्याची माहिती या मोर्चाचे नेतृत्व केलेले बाबाराव आवरगंड यांनी दिलीय........
गेल्या अनेक महिन्यांपासून परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत आहे.......
त्यांच्या मानधनाचा प्रश्न देखील अद्याप सोडवल्या अपयश आले आहे अधिकारी काम करत नाहीत.....
शासन मदत करीत नाही यामुळे संतापलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी बाबाराव आंवरगंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मोर्चा काढला....
ढालेगाव बंधारा पत्रातुन विसर्ग सुरु,पाणयाची आवक सुरुच.
ढालेगांव बंधारा पात्रात विसर्ग सुरू....
परभणी
विशेष
लागोपाठ दोन दिवस धो धो पावसाने परभणी जिल्हा धुऊन काढला मस्त पाऊस आला .....
परभणी जिल्ह्याचा सर्व भागात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे......
नदी-नाले तुडुंब वाहून जात आहेत.....
शेतामध्ये पाणी वाहिले आहे काही ठिकाणी किरकोळ घटना घडल्या .....
अनेक ठिकाणी पावसाने वाहतूक ठप्प केली काही गावांचा संपर्क तुटला होता.....
....या पावसाने एक मोठा दिलासा दिला आहे परभणी जिल्ह्यात पाऊस हवा होता वरुणराजाने कृपादृष्टी केली होती गेली दोन दिवस तुफान पावसाने शेतकरी सुखावला आहे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.....
पाथरी तालुक्यात मागील तीन दिवसा पासुन संततधार पावसाने गोदावरी नदीवरील ढालेगांव बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने दि.२१ रोजी सकाळी ८ वा.ढालेगांव बंधा-याचा एक दरवाजा उघडून नदी पाञात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे अगोदरच ६० % भरलेला मुदगल बंधाराही आज पूर्ण क्षमतेने भरणार आहे. ढालेगांव बंधा-याची पाणी साठा क्षमता १४.८७ द.ल.घ.मी. तर मुदगल बंधा-याची पाणीसाठा क्षमता ११.८७ द.ल.घ.मी ऐवढी आहे. ढालेगांव बंधा-यातील पाण्याच्या विसर्गामुळे आता मुदगल बंधा-याचाही एक दरवाजा दुपार नंतर उघडला जाईल असे लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सध्या ढालेगाव बंधारा १००% भरलेला असून एक गेट उघडले आहे. नदी पात्रामध्ये २४९.८८ क्युमेक्स विसर्ग चालू आहे.
दरम्यान मागील तीन दिवसाच्या संततधार पावसाने पाथरी तालुक्यातील गोदावरी नदी वरील ढालेगांव तुडूंब भरल्याने आता मुदगल बंधाराही भरण्याच्या मार्गावर असून यातून विसर्ग केव्हाही सुरू होऊ शकतो.त्या मुळे नदी काठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.पाथरी तालुक्यातील तीन ही मंडळात मंगळगवारी सकाळी आठ वाजे पर्यंत पाथरी मंडळात ७४ मी.मी. आज पर्यंत ५८०.५० मीमी तर बाभळगाव मंडळात ३२ मीमी, आज पर्यंत २९०.००. मीमी तर हादगाव मंडळात ७७ मीमी आज पर्यंत २९६.५०मीमी पाऊस झाला असून आजचा तीन्ही मंडळातील मिळून सरासरी ६१.०० मीमी पाऊस झाला आहे आज पर्यंत वार्षीक सरासरीच्या ५०.६६% एवढा पाऊस पाथरी तालुक्यात झाला असुन तालुक्याची वार्षीक सरासरी ही ७६८.५० एवढी आहे.
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...