रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

मराठा आरक्षण -आज पाथरीत विद्यार्थी रस्त्यावर उरतणार.

मराठा समाजाला आरक्षण  जाहीर करावे या मागणीसाठी जिल्ह्यात मागिल २० दीवसापासुन मराठा  समाज बांधव वेग-वेगळ्या मार्गाने आंदोलन करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणुन आज पाथरी येथे मराठा  आरक्षण साठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी रस्त्यावर उतरणार असल्याची माहीती सकल  मराठा समाजबांधवाच्या वतिने देण्यात आली आहे:.
        मागील सतरा दीवसापासुन पाथरी येथे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात येत आहे.त्याच बरोबर शासनाची कानउघडणी करण्यासाठी शनिवारी रात्री जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.
       आज सोमवार दी.६रोजी शहरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी यांचा मोर्चा पाथरी तहसिल कार्यालयावर काढण्यात येणार आहे.
या मोर्चात मराठा समाजबांधवानी मोठ्या संख्येन उपस्तित राहण्याचे अव्हाहन सकल मराठा समाजबांधवच्या वतिने करण्यात आले आहे.या मोर्चाची सुरवात पाथरी-माजलगाव राष्ट्रीय महामार्ग वरील संभाजी चौक येथुन सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा मोर्चा  निघणार आहे.
      शिस्तबध्द पध्दतीने हा मोर्चा काढला जाणार असुन तो तहसिल कार्यालयावर धडकणार आहे.त्यानंतर विद्यार्थीनी व विद्यार्थी यांच्या हस्ते प्रशासनाला निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहीती सकल मराठा समाजबांधवाच्या वतीने देण्यात आली आहे.
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...