हादगांव बु. प्रशालेत पालक शिक्षक व विद्यार्थी सुसंवाद मेळावा संपन्न.
पाथरी (वार्ताहर)
सद्यस्थितीत मोबाईल ,दुरध्वनी यामुळे शाळे व्यतिरिक्त वेळेत वाचण व लिखाण करणे याचा विद्यार्थांना विसर पडला आहे याकडे पालकांचेही दुर्लक्ष होत आहे .त्यामुळे शाळेव्यतीरीक्त वेळेत पालकांनी विद्यार्थ्यांचा गट तयार करून अभ्यास घेणेसाठी अभ्यासीका हा पँटर्न राबवावा.असे आवाहन जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते यांनी पालकांना केले.
पाथरी तालुक्यातील हादगांव बु.येथील जिल्हा परिषद शाळेत ११ आँगष्ट रोजी आयोजीत पालक शिक्षक व विद्यार्थी सुसंवाद मेळाव्यात अध्यक्षीय समारोप प्रसंगी जि.प.उपाध्यक्षा सभापती सौ.भावनाताई अनिलराव नखाते ह्या बोलत होत्या .मेळाव्याचे उद् घाटन बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी पं.स.सभापती राजेश ढगे ,पं.स.सदस्य राधाकिशन डुकरे ,शाळा समिती अध्यक्षा सौ. सुरेखा नखाते ,सरपंच श्रीकिशन नखाते ,गट शिक्षणाधिकारी विश्वास खोगरे ,शालेय पोषण आहार अधिक्षक त्र्यंबक पोले ,केंद्रप्रमुख अंकुश मुंढे ,बोरगाव येथील मुख्याध्यापक बजरंग गिल्डा,पोलीस पाटील गजानन शिंदे,ग्रा.प.सदस्य लक्ष्मण नखाते,शेख अहेमद ,सतिश नखाते ,शिक्षक रामेश्वर झिंजान यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना सौ भावनाताई नखाते म्हणाल्या की शाळेत शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नविन तंत्रज्ञानाचा वापर करून गृहपाठाची तपासणी दैनंदीन करावी.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनीही उच्च पदावर नौकरीचे ध्येय ठेवून ते मिळवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे सांगत रिक्त पदासह भौतिक सुविधा याकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल असे आश्वासन सौ नखाते यांनी दिले तत्पूर्वी बजरंग गिल्डा ,रामेश्वर झिंजान व गटशिक्षणाधिकारी विश्वास खोगरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी खेळीमेळीच्या व उत्साहपुर्ण वातावरणात पालक शिक्षक व विद्यार्थीमध्ये सुसंवाद घडुन आला.यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे आसेच म्हणता येईल. यावेळी मान्यवरांचे हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मातीपासून तयार केलेल्या विविध कलाकृतीच्या दालनाचे उद् घाटन ही मान्यवर यांचे करण्यात आले.प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रजापती आचार्य यांनी केले तर सुत्रसंचलन प्रसाद शेंदुरवाडकर यांनी केले.पालकांची उपस्थिती लक्षवेधी होती.यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
रविवार, १२ ऑगस्ट, २०१८
हादगाव बु.प्रशालेत पालक शिक्षक व विद्यार्थी सुसंवाद मेळावा संपन्न.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा