शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८

आश्चर्य! परभणीत मत्स्यसदृश्य बाळाचा जन्म

आश्चर्य! परभणीत मत्स्यसदृश्य बाळाचा जन्म - जिल्हा रुग्णालयात मत्स्यसदृश्य बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी या बाळाला सुखरूप जगात आणले. मात्र, त्याची प्रकृती नाजूक असून त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. जिल्हे स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कालिदास चौधरी म्हणाले, की 'अशी केस लाखात एखादी असते. याला (Sirenomelia) वैकल्पिकरित्या मरमेड सिंड्रोम म्हणून ओळखले जाते, ही एक दुर्मिळ जन्मजात विकृती आहे. ज्यामध्ये बाळाचे पाय एकत्र होतात. त्याला एक माशाची शेपूट दिसू लागते. बाळाच्या आईने गरोदरपणात एकदाही सोनोग्राफी केलेली नाही. यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही. ही महिला शनिवारी दुपारी १२ वाजता रुग्णालयात दाखल झाली होती. तिची तपासणी केली असता, परिस्थिती पाहून तत्काळ शस्त्रक्रिया (सिजर) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर असे बाळ जन्माला आल्याचे दिसून आले.
बाळाची प्रकृती नाजूक असून त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी होऊ

शकते का, या तपासणीसाठी आम्ही बाळाला नांदेड, औरंगाबाद येथील प्लास्टिक सर्जनकडे पाठवणार आहोत. त्यांच्या सल्ल्याने पुढील उपचार केले जातील, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले. या बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे नाव सविता बोचरे असे असून ती मानवत तालुक्यातील पिंपरा या गावाची रहिवासी आहे. तिच्या पोटात दुखत असल्याने कुटुंबियांनी तिला प्रथम सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथून तिला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...