परभणी- सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, हा पाऊस प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी पोषक ठरणार आहे.
जुलै महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती़ १६ आॅगस्ट रोजी पावसाचे पुनरागमन झाले़ मात्र एकच दिवस हा पाऊस बरसला़ त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या़ दरम्यान, २० आॅगस्ट रोजी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत़ परभणी शहर व परिसरात पहाटे पावसाला सुरुवात झाली़ सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला़ सकाळी १० वाजेनंतर मात्र पावसाचा जोर चांगलाच वाढला़ दुपारी २ वाजेपर्यंत शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ दुपारी ३ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता़
परभणी शहराबरोबरच जिंतूर, मानवत, पालम, पाथरी,सोनपेठ, पूर्णा, सेलू तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे़ सर्वदूर पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावले आहेत़ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अजूनही कोरडे असून, या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़
४२ मिमी पाऊस
परभणी शहर व परिसरात सोमवारी पहाटेपासून दुपारी २.३० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे़ दिवसभरात ४२.२ मिमी पाऊस झाल्याची माहिती या विभागातून देण्यात आली़
सोमवार, २० ऑगस्ट, २०१८
परभणी जिल्हात संततधकार सुरुचि,सर्वत्र पाणीच पाणी ओढे नाले वाहु लागलें.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा