शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

रोटरी क्लबच्या वतिने नेताजी सुभाष विद्यालयात आरोग्य तपासणी

आज नेताजी सुभाष विद्यालय मध्ये रोटरी क्लब पाथरी - मानवतच्या वतीने  विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी , प्रत्येक विद्यार्थ्यास त्याचे ब्लड ग्रुप कार्ड , व्हिटॅमिन A/D तसेच मुलांमधील हृदयाच्या  आजाराचे निदान व त्यावरील  मोफत शास्त्रक्रियेसाठीच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले . शाळेमधील सर्व 1200 विध्यार्त्यांना या शिबिराचा लाभ मिळाला आहे.                                  डॉ .अतुल भाले ,डॉ.निवृत्ती पवार ,डॉ.प्रशांत सासवडे ,डॉ.प्रमोद गौड, डॉ .सचिन कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना व्हिटॅमिन  A आणि व्हिटॅमिन D च्या गोळ्या वाटप केल्या .  डॉ जगदीश शिंदे मुलांमधील हृदयाचे आजाराचे निदान  व त्यावरील मोफत शास्त्रक्रिये साठी रोटरी क्लब पाथरी - माध्यमातून संपूर्ण सहकार्य करणार आहेत .                  या कार्यक्रमासाठी संस्थेचे प्रिन्सिपल कांबळे सर ,शिवराज नाईक सर व सर्व शाळेतील शिक्षक वृंदाचे पूर्ण सहकार्य लाभले.                                           रोटरी क्लब पाथरी -मानवत च्या या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील 1लाख विध्यार्थ्यांना होणार आहे .                                                या कार्यक्रमाला क्लब चे सचिव श्री सुभाष बारहाते साहेब ,सरपंच संतोषराव लाडाने ,नगर सेवक अलोक चवधरी ,मोतीराम निकम ,अनिल गोंगे ,पप्पू चिलवंत , बाळासाहेब दुबाले डॉ .भोसले ,डॉ.जाधव,कैलाश कसबकर , अशोकराव कुटे ,संजय पामे,अतुल टेकाळे ,भगवान ढवळशंक ,जगदीशजी राठी आदींची उपस्थिती लाभली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...