*सोनपेठ कडकडीत बंद ; विवीध ठिकानी चक्काजाम शांततेत*
सोनपेठ / प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यात सकल मराठा समाज बांधवांच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या दि.9 आँगस्ट गुरुवार रोजी च्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या बंदला व्यापारी महासंघाने पाठींबा व्यक्त केला. बंद मुळे बस स्थानकातून सकाळपासून एकही बस आली अथवा गेली नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले होते.
मराठा समाजाच्या प्रलंबित असलेल्या आरक्षण व इतर मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधन्या साठी व मागण्या मान्य करून घेन्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रभर विविध आंदोलने करण्यात आली. परंतू मागण्यांवर निर्णय होत नसल्यामुळे, संपुर्ण महाराष्ट्रात बंद व चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्ष आंदोलनास सुरूवातही झाली. तालुक्यातील गवळी पिंपरी येथील सोनपेठ-गंगाखेड-परळी वैजनाथ रोडवरील राजमाता माँ जिजाऊ चौकात ग्रामस्थांनी ह.भ.प.नामदेव महाराज फपाळ यांचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले होते. तालुक्यातील उक्कडगांव मक्ता, नरवाडी, डिघोळ (दे.), शेळगांव, खपाट पिंपरी, वाणीसंगम, आवलगांव, सायखेडा आदी गावांसह अन्य ठिकाणीही चक्काजाम, रास्तारोको, ठिय्या असे विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. वरील सर्व ठिकाणी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत महिला तसेच पूरूष हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसले.यावेळी बैलगाडी व मोटार सायकल रस्त्यावर लाऊन सर्वत्र चक्काजाम दिवसभर दिसुन आला. तत्पूर्वी सोनपेठ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून संयोजकांच्यावतीने आंदोलन शिस्तबद्ध व शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. काही अनुचित प्रकार घडूनये यासाठी ठिक ठिकाणी चोख पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त दिसुन आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा