सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

मुस्लिम आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे-जमिएत-ए-उल्मा

जितुंर-प्रतिनिधी 
मराठा समाजाच्या आरक्षण मागणी आंदोलना नंतर आता राज्य सरकारने घोषीत केलेले  मुस्लिम आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे, यासाठी जिंतूर मधून आज 6 अगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिंतूर तहसीलदारां मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी जनजागरण समिती, शाखा-जिंतुर, जमिएत-ऐ-उल्मा यासह स्थानिक परिसरातील मुस्लिम समाजातील धार्मिक आणि सामाजीक क्षेत्रातील विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्या सह शेकडो मुस्लीम बांधव उपस्थित होते. सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मान.न्यायालयाने १९ जुलै २०१४ रोजी मुस्लीम आरक्षण लागू करण्या संदर्भात आदेशीत केलेले असून, २०१४ नंतर आघाडी सरकार पायउतार झाल्या नंतर मुस्लीम समाज मागास असून सुद्धा विद्यमान युती सरकारने मुस्लीम आरक्षण देण्यास विलंब केला आहे. मुस्लीम आरक्षण तात्काळ लागू केल्यास आगामी मेगा नौकरी महाभरती मध्ये मागास असलेल्या मुस्लिमांना या आरक्षणाचा लाभ मिळून समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी मदत होईल. राज्य सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा असे ही या निवेदनात म्हटले आहे, अन्यथा येणाऱ्या २५ ऑगस्ट नंतर लोकशाही मार्गाने आपली भूमिका घेतली जाणार असल्याचे निवेदकां कडून सांगन्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...