रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सेलु येथिल युवकाची आत्महत्या .

◆धनगर आरक्षणासाठी युवकाची गळफास लावुन आत्महत्या
◆गोमेवाकडी येथील घटना
सेलु(प्रतिनिधि) :तालुक्यातील गोमेवाकडी येथे धनगर समाजास अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात शासनस्तरावरुन विलंब होत असल्याने युवकाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवार 12 रोजी योगेश राधाकिशन कारके(20) या युवकाने राहत्या घरातील पत्राच्या आढुला रुमालाच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना दुपारी 12:30 च्या दरम्यान घडली आहे.मयत योगेश याने त्याच्या मोबाईल वरुन मि धनगर समाजासाठी जीव देत आहे असा शब्द संदेश(टेक्ट मेसेज) लिहीत तो बी. शिंदे यांच्या नंबरवर पाठविण्याचा प्रयत्न केला परंतु नेटवर्कच्या कारणामुळे तो संदेश पुढे पोहचु शकला नाही. अशी माहीती घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेलेले पोलिस कर्मचारी यांनी दिली आहे.मयत योगेश याचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असुन घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक डाँ. नितिन काशीकर व बिट जमादार चौरे हे करत आहेत.मयत योगेश यांच्या पाश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.
◆शासनाकडुन आर्थीक मदत व नोकरी चे अश्वासन.
मयत योगेश कारके यांनी धनगर समाजास अनुसुचित जमाती मध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी स्वत:चे जिवन संपविले यामुळे संतप्त नातेवाईकांनी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मृतदेह पोलिस स्टेशन गेट समोर ठेवुन ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन मयत योगेश कारके यांच्या कुटुंबियांना शासनाकडुन दहा लाख रुपये आर्थीक व कुटुंबातील एक व्यक्ती शैक्षणिक पात्रतेनुसार शासकिय सेवेत घेण्यात येईल असे पत्र पाठविण्यात आले व ते पत्र तहसीलदार यांनी वाचन करुऩ दाखवले असल्याने नातेवाईकांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्नायात नेवुन उत्तरीय तपासनी झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांना देण्यात आले व सांयकाळी अंत्यसंस्कार  करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...