महाराष्ट्र बंदची हाक -जिल्यात कडकडीत बंद
मराठा क्रांति मोर्चा च्या वतीने महाराष्ट्र बंद ची हाक दिल्याने आज सकाळ पासूनच मानवत सेलू पाथरी मानवत पूर्णा गंगाखेड सोनपेठ जिंतूर पालम परभणी तालूका क्रांति मोर्चा ,सकल मराठा समाजाने संपूर्ण तालूक्यात जिल्ह्यातील चक्का जाम आंदोलन करून शासनाचा निषेध केला......
सविस्तर वृत्त असे की , मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने सकल मराठा समाजाला आरक्षणाची मागणी केली.
गेल्या आठरा दिवसा पासून पाथरी-मानवत-सोनपेठ गंगाखेड ईतर तालुक्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सूरू केले असून ही या आंदोलनाकडे सरकारणे साफ दूर लक्ष केले त्यामूळे मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र नऊ आगष्ट क्रांति दिनी चक्का जाम करण्याची हाक दिल्यानेच आज संपूर्ण जिल्ह्यातिल सर्व तालूक्यात चक्का जाम व कडकडीत बंद आंदोलन करण्यात आले.
पाथरी-मानवत शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर तहसिल परिसरात आंदोलन कर्ते जमा होत गेले .पाथरीतील आष्टी फाटा;पोखर्णी फाटा चौक,कारखाना परीसर,आयटीआय काँलेजआज सकाळपासुनच शेतकरी मराठा आंदोलक आपल्या बैलगाड़ी सह महीला मुलाबाळा सहीत जमा झाले होते मानवत येथे दोन हाजार मराठा समाज बांधवानी मेन रोड वर ठिय्या दीवसभर सुरुच होते.
सर्व आहे त्या ठीकाणी आप-आपल्या भागातील मराठा बांधवांनी रास्ता रोको करूण चक्का जाम आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला तर मानवत शहरातील एक हजार लहान मोठ्या दूकानदार व प्रतिष्ठाणानी आपले सर्व दूकाने बंद ठेऊन आंदोलनाला पांठिंबा दर्शविला तहसिल परिसरातील रोड वर सूरू असलेल्या चक्का जाम आंदोलना मध्ये सामिल झाले होते.
आंदोलन काळात काही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा