लक्ष्मण उजगरे-पाथरी प्रतिनिधी वडिलांकडे असलेलं कर्ज आणि नापीक याला कंटाळून तालुक्यातील कान्सूर येथील एका २८ वर्षीय तरूनाने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महात्या केल्याची घटना घडली. कान्सूर येथील आशोक लक्ष्मण गिरगुने वय २८ या तरून शेतक-याने सततची नापीकी आणि बँकेचे कर्ज याला कंटाळून स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळाफास घेऊन आत्महात्या केली.
आशोक गिरगुने याला अजून दोन भाऊ असून आई वडील, पत्नी दोन मुले असल्याचे सांगण्यात येते या संपुर्ण कुटूंबात साडेचार एकर जमिन असून त्याच्यावर बँकेचे कर्ज असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचल्याचे सांगण्यात येत आहे. या विषयी आशोक गिरगुने यांनी आपण कर्जाला कंटाळून आत्महात्या करत असल्याची चिठ्ठी खिशात लिहून ठेवली होती, असेही सांगण्यात आले. या विषयी त्याचा भाऊ परमेश्वर लक्ष्मण गिरगुने यांच्या फिर्यादेवरून पाथरी पोलीसात नोंद झाली असून, शवाची उत्तरीय तपासनी करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा