मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

लक्ष्मन उजगरे-आवाज परभणीकरांचा ---------- पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते युवा माहीती दुत उपक्रमाचा १५आँगस्ट रोजी शुभारंभ

लक्ष्मन उजगरे-आवाज परभणीकरांचा
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते युवा माहिती दूत उपक्रमाचा15 ऑगस्ट रोजी शुभारंभ*
 
परभणी,दि.14 :- शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच युनिसेफच्या सहकार्याने युवा माहिती दूत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10.15 वाजता परभणी येथील जिंतूर रोडवरील कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात होणार आहे.
शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. युवा माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲप वर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणा-या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटुंबाशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटुंबाशी भेट दिल्याबाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी, परभणी हे या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
15 ऑगस्ट 2018 रोजी आयोजित कार्यक्रमास जिल्ह्यातील वरीष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, युवक-युवतींनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...