मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

अंगणवाडी सेविका आणी मदतनबीस यांच्या परभणी जिल्हापरीषदेवर जबरदस्त मोर्चा,सिओंना घेराव

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आज परभणी जिल्हा परिषदेवर जबरदस्त मोर्चा धडकलाय....... मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेय.......
या आठ दिवसांमध्ये हा प्रश्न अधिकाऱ्यांनी सोडवला नाहीतर यापेक्षाही मोर्चा काढू असा खणखणीत इशाराही देण्यात आला आहे अधिकाऱ्यांनी वेळेवर कामे करावीत अंगणवाडी सेविकांची समस्या तातडीने जाणून घेऊन सोडविण्यात यावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली
यासंदर्भात आठ दिवसांमध्ये चौकशी करून योग्य न्याय दिला जाईल अशी हमी दिल्याची माहिती या मोर्चाचे नेतृत्व केलेले बाबाराव आवरगंड यांनी दिलीय........
गेल्या अनेक महिन्यांपासून परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येत आहे.......
त्यांच्या मानधनाचा प्रश्न देखील अद्याप सोडवल्या अपयश आले आहे अधिकारी काम करत नाहीत.....
शासन मदत करीत नाही यामुळे संतापलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी बाबाराव आंवरगंड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मोर्चा काढला....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...