भारतीय हवामान खात्यान मराठवाड्यात मंगळवार (दि.२१) आणि बुधवारी (दि.२२) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने मंगळवारी नांदेडसह बीड, लातूर, हिंगोली, परभणी जिल्ह्यात तर बुधवारी जालना, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सर्व विभागाना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. आणखी पाऊस झाल्यास पूर तसेच अन्य आपत्तीचा धोका संभावित त्यामुळे सर्व विभागानी समन्वय ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यालयीच राहण्याचे आदेश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यात रविवारी रात्रिपासून संततधार पाऊस सुरुच आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचा रात्री उघडलेला एक दरवाजा आज बंद करण्यात आला. जिल्ह्यातील अनेक भागातील नदी नाले पहिल्यांदाच ओसंडून वाहतआहेत
सोमवार, २० ऑगस्ट, २०१८
परभणीसह मराठवाड्यात २१;२२तारखेला अतिव्रष्टीचा हवामान खाच्याचा इशारा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा