शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे
-शिक्षणाधिकारी कुंडगीर
गंगाखेड (प्रतिनिधी)-
मुलंही पालकांनी शिक्षणासाठी ताब्यात अति विश्वासाने दिलेली संपत्ती असून त्याला तडा न जाऊ देता शिक्षकांनी पालकांचा विश्वास संपादन करण्यासोबतच मुलांवर शैक्षणिक संस्कार आणि संगोपनातून गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यवतमाळचे शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर यांनी गंगाखेड येथे मंगळवार (दिनांक 21) रोजी ‘करिअर मार्गदर्शन मेळावा’ प्रसंगी गंगाखेड येथे केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संयोजिका सौ. राजेश्रीताई जामगे या होत्या.
ग्रामीण पत्रकार संघ व सरस्वती विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वर्ग आठवी, नववी ,दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर मार्गदर्शन मेळाव्या’चे आयोजन समर्थ गंगाधर मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. पुढे बोलताना कुंडगीर म्हणाले, सध्या मोबाईलचा जमाना आहे, मोबाईलचे जेवढे फायदे आहेत तेवढेच तोटेही आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अनिष्ट गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आपला पाल्य काय करतो आहे याची खबरदारी पालकांनीही वेळोवेळी घ्यायला हवी.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सोहन माछरे, शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगीर, सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव दीपक तापडिया, मेजर विश्वनाथ सातपुते ,लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊनचे अध्यक्ष दगडुलाल सोमाणी, पंचायत समितीचे शाखा अभियंता दीपक पाटील, प्रा. सौ. जयश्री पछाडे हे मान्यवर उपस्थित होते .
गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर इंगळे व सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक राम पाठक यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक गंगाधर कुलकर्णी यांनी केले. मेळाव्यात मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी विद्यार्थ्यांना विचार करून योग्य करिअर निवडावे जेणे करून आपले भविष्य उज्वल होईल असे सांगितले. जयश्री पछाडे यांनी मेडिकल, इंजिनिअर या व्यतिरिक्त ही इतर क्षेत्र आहेत ज्यात विद्यार्थ्यांना करिअर करता येते असे सांगितले.
दहावीची परीक्षा देताना विद्यार्थी दशेतील हा टर्निंग पॉइंट असतो त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी अभ्यास मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात सौ. राजेश्रीताई जामगे यांनी केले.
यावेळी ‘काहूर’ने काढलेल्या शैक्षणिक विशेषांकाचे विमोचन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर इंगळे, संस्थापक रमेश कातकडे, सचिव विकास साळवे, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन योगशिक्षक गोपाल मंत्री यांनी केले.
कार्यक्रमासाठी विद्यार्थी - विद्यार्थिनी व शिक्षक त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.
मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८
शैक्षणिक गुनवत्तेत वाढी होण्यासाठी शिक्षकांनी प्रयन्त करणे गरजेच-शिक्षणाधिकारी कुंडगीर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा