बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

मानवत येथे पन्नास हजार चारशे रुपयाची गंठण हिसकावून अज्ञात चोरटे पसार झाले

सविस्तर वृत्त  अशी की,मानवत येथील गोदूल्ली येथिल  रहिवाशी महिला सौ.शिवकन्या अक्षय मोरे ह्या
दुपारी दोन-अडीचच्या सुमारास बाजारात सामायन खरेदी करून घरी पायी जात होत्या व त्याच्या सोबत त्यांच्या मैञीन
ऋतुजा पाटील हि सोबत होत्या  यावेळी दोन ईसम काळे टि शर्ट घातलेले व बल्यु पँन्ट घातलेले वय २५ ते २८ वर्ष विना नंबर मोटरसायकल वर मागे बसलेल्या अज्ञात व्यक्तिचे केस वाढलेले हे मोटरसायकल वर भरधाव वेगाने समोरुन आले व त्यांनी महिलांच्या गळ्यातील गंठन ओढुन मोटरसायकल वर पळुन जात आसताना महिलांच्या हातात दोन ग्राम सोन्याचे डोरले राहिले व त्यानी घाबरून आरडाओरडा केला असता गल्लीतुन जाणारे एका व्यकतीने मदतीला येऊन पळत मोटरसायकल चा पाठलाग केला परंतु चोरटे तुटलेले गंठण घेऊन पळुन गेले  या प्रकरणी सौ.शिवकन्या अक्षय मोरे यांच्या तक्रारीवरुन मानवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१६०/१८ कलम ३७९ ,३४ भा.द.वि.अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला असुन अधिक  तपास बिट जमादार प्रताप  साळवने हे करीत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...