मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

संकेत कुलकर्णी खुन प्रकरणी विषेश सरकारी वकील उज्वल निकमयांची नियुक्ती

परभणी -औरंगाबाद येथील कामगार चौकात पाथरी शहरातील संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन युवकाचा कारखाली चिरडून भर चौकात खून करण्यात आला होता. याविषयी समाज भावना तीव्र झाल्या होत्या. औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या निषेध सभेत या घटनेचा निषेध नोंदवत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मयत संकेत कुलकर्णीच्या वडीलांनी मागणी केल्यानुसार या खटल्यात विशेष  सरकारी  वकील अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यातआली होती. त्यानुसार मंगळवार १४ ऑगष्ट रोजी या प्रकरणात विधी व न्याय विभागाने अॅड उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीचे आदेश काढले आहेत. आैरंगाबाद येथील कामगार चौकात २३ मार्च रोजी संकेत कुलकर्णी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास सात-आठ वेळा कारखाली चिरडून त्याची निर्घन हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपुर्ण औरंगाबाद शहर हादरले होते. अत्यंत निघृणपणे भर रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेच्या विरोधात आैरंगाबादेतील तरूण व नागरीकांनी निषेध सभा घेऊन या खटल्यात अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आ. निलमताई गो-हे, आ. संजय सिरसाठ, आ. अतुल सावे, आ. इम्तीयाज जलील, आ. बाबाजानी दुर्रांनी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जनतेच्या भावनेचा आदर करून अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती.त्या नुसार मंगळवारी १४ ऑगष्ट रोजी विधी व न्याय विभागाने या खटल्यात विषेश सरकारी वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आदेश काढले असल्याची माहिती मयत संकेत कुलकर्णीचे वडील पाथरी येथील रहिवासी संजय कुलकर्णी नवाकाळ,शी बोलतांना दिली. या गुन्ह्याचे दोषारेप पत्र औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाले. असून यातील एका आरोपीचा जामीन नुकताच फेटाळण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...